टीम इंडियाची ‘रनमशीन’ असणाऱ्या विराट कोहलीची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होत असलेली तुलना योग्य नसल्याचे मत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे. सचिन तेंडुलकरची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असे लतादीदींनी म्हटले आहे.
सध्या क्रिकेटच्या बातम्या चर्चेच आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, काही जणांकडून सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना केली जात आहे. ही गोष्ट मला आवडलेली नाही. सचिन आणि विराट दोघेजणही आपापल्या जागी मोठे खेळाडू आहेत. विराटचे भविष्य खूपच उज्ज्वल आहे. पण सचिनचा खेळ ही एक दीर्घ तपस्या असल्याने त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे लतादीदींनी म्हटले.
Namaskar.Aaj news mein cricket ke baare mein bahut kuch bataya ja raha hai,ye acchi baat hai (cont) https://t.co/ThfFQOhRQK
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 31, 2016