टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या खराब कामगिरीबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे, की भारतीय संघ सध्या दोन भागात गटात विभागला गेला आहे. एक गट विराट कोहलीसोबत आहे आणि एक गट त्याच्या विरोधात आहे.
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हे मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, ”विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही वाईट निर्णय घेतले आणि तरीही तो एक महान क्रिकेटर असल्याने सर्व खेळाडूंनी त्याचा आदर केला पाहिजे. मला माहीत नाही, की भारतीय संघात दोन कॅम्प का आहेत? एक कॅम्प विराट कोहलीसोबत आहे आणि एक त्याच्या विरुद्ध आहे. हे अगदी स्पष्ट आहे. हा संघ विभागलेला दिसतो.”
हेही वाचा – T20 World Cup : इंग्लंडपुढं ‘मोठं’ संकट..! सेमीफायनलमध्ये संघ पोहोचला, पण…
अख्तर पुढे म्हणाला, ”कर्णधार म्हणून हा त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक किंवा त्याने काही चुकीचे निर्णय घेतले असल्यामुळे गटबाजी असू शकते. पण तो खूप मोठा क्रिकेटर आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.”
भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी खूपच खराब होती. पहिल्या सामन्यात संघाने १५१ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना केवळ ११० धावा करता आल्या. दुसरीकडे, भारताचा गोलंदाजी विभागही कमकुवत दिसत आहे.