विश्वचषकात भारताविरुद्धची कामगिरी सुधारता न आल्याने पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. अयोग्य रणनीती आणि चुकीची संघनिवड या कारणांसाठी दोघांना दोषी धरण्यात आले आहे. ‘‘संघव्यवस्थापनाला खेळपट्टी समजता येत नसेल तर अन्य गोष्टींना काहीच महत्त्व नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करणे अनाकलनीय होते,’’ या शब्दांत ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानच्या महिला संघाच्या कामगिरीने पुरुष संघाचे अपयश बाजूला सारले असा आशयाचा मथळा ‘द नेशन’ वृत्तपत्राने छापला आहे. पाकिस्तानच्या महिला संघाने दिल्लीत झालेल्या लढतीत भारतीय संघावर दोन धावांनी थरारक विजय मिळवला.

Story img Loader