सोशल मीडिया सेलेब्रिटिंना आपल्या चाहत्यांसमवेत जोडण्याची संधी देते, परंतु, क्वचित प्रसंगी सोशल मीडियाचा मंच सेलेब्रिटींसाठी डोकेदुखीदेखील ठरतो. अलिकडेच विराट कोहलीने अनुष्का शर्माला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देणाऱ्या लोकांना कडक शब्दांत सुनावले. आता हरभजन सिंगनेदेखील काहीस असचं केलं आहे. ( Full Coverage || Fixtures || Photos )
टी २० वर्ल्ड कप सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला क्रिकेटपटू हरभजन सिंगला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसल्याने एका टि्वटर युजरने टोमणा देणारे ट्विट पोस्ट करत हरभजनची थट्टा केली. हा संदेश वाचल्यानंतर भज्जीनेदेखील आपल्या अंदाजात त्याला उत्तर दिले. टि्वटर यूजर हरभजनला उद्देशून लिहिलेल्या संदेशात म्हणतो, ”‘भाई तेरा इंडिया टूर कैसा चल रहा है, मजा आ रहा होगा? फ्री के होटल्स, लंच, डिनर, सब कुछ। मस्त लाइफ है।’’ यावर भडकलेल्या हरभजनने “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार… और तुम उनमें से एक हो|” ही म्हण लिहून सडेतोड उत्तर दिले. हरभजनच्या चाहत्यांनादेखील या युजरचा टि्वटरवर चांगलाच समाचार घेतला. हरभजन सिंग टी-२० वर्ल्ड कपच्या संघात असला तरी अद्याप त्याला एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही.

Story img Loader