ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची शनिवारी करोडो चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र, हा सामना आणखी एका कारणासाठी विशेष ठरला. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात भारताचे राष्ट्रगीत गाऊन या सामन्याला चारचाँद लावले.
काल सामन्याआधी महानायक अमिताभ बच्चन यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने भारताचे तसेच पाकचा गायक शफाकत अमानत याने पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ यांनी आमंत्रणाबद्दल सौरव गांगुलीचे आभार मानून भारत- पाकमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याबद्दल यावेळी शुभेच्छाही दिल्या. तसेच, अमिताभ यांनी आपल्या भाषणात आधी कोलकातावासीयांशी बंगाली भाषेत संवाद साधला. ‘‘जो संघ सर्वोत्तम खेळेल, तो जिंकेल,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
शनिवारी रात्री ‘विजयाचा विराटाध्याय’ लिहिला गेल्यानंतर भारतीय चाहत्यांनी शानदार जल्लोष साजरा केला. पाकिस्तानच्या ११८ धावांचा पाठलाग करताना भारताने कोहलीच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला.
पाहाः अमिताभ यांच्या आवाजातील राष्ट्रगीत

Story img Loader