पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा संघासाठी तारणहार ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर विराट कोहलीने नाबाद ५५ धावांनी खेळी साकारून भारताला पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण सामन्यात विजय प्राप्त करून दिला. संघाचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर विराटने मैदानात टिच्चून फलंदाजी करत अर्धशतक साजरे केले. मात्र, या सामन्यात विराटने आपली अर्धशतकी खेळी खास पद्धतीने साजरी केली.(Full Coverage|| Fixtures||Photos)

कोहलीने आपल्या ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील १४ वे अर्धशतक ठोकल्यानंतर दोन्ही हात उंचावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरच्या दिशेने अभिवादन केले. पाकविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्याला स्टॅण्डमध्ये सचिनसह बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी देखील उपस्थित होत्या.

सचिन तेंडुलकरला पाहत मी लहानाचा मोठा झालो आणि आज त्यांच्यासमोर विजयी खेळी केल्याचा आनंद अवर्णनीय आहे, असे विराट सामना झाल्यानंतर म्हणाला.

Story img Loader