ज्या वानखेडे स्टेडियमवर भारताने २००११ साली विश्वचषक विजयाचे स्वप्न साकारले..याच वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने भारताने आजवर भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण विजय प्राप्त केले. मात्र, याच स्टेडियमवर आज भारताला एका कटू आठवणीची नोंद करावी लागणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसारख्या एका महत्त्वपूर्ण लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ( Full Coverage || Fixtures || Photos )
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला आणि यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताने दिलेल्या १९३ धावांच्या आव्हानाचा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी केवळ ३ विकेट्सच्या मोबदल्यात दोन चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला. विंडीजच्या संघात खास आजच्या सामन्यासाठी संधी देण्यात आलेला लेंडन सिमन्स विजयाचा शिल्पकार ठरला. अर्थात सामन्यात त्याला दोन वेळा गोलंदाजांनी टाकलेल्या नो बॉलमुळे जीवनदान मिळाले. पण त्याने ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा ठोकल्या.
विस्फोटक ख्रिस गेलला स्वस्तात बाद करण्यात भारताला यश आले होते. बुमराहने आपल्या अप्रतिम यॉर्करच्या बळावर गेलला त्रिफळाबाद केले. त्यानंतर सॅम्युअल्स देखील झटपट माघारी परतला. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर विंडीजच्या जॉन्सन चार्ल्स आणि सिमन्सने संघाचा डाव सावरला. चार्ल्सने तुफान फटकेबाजी करत ३६ चेंडूत ५५ धावा ठोकल्या. चार्ल्स आणि सिमन्स जोडीने मैदानात जम बसवल्याने लक्षात आल्यानंतर धोनीने गोलंदाजीत एक आश्चर्यकारक बदल करत विराट कोहलीला चेंडू दिला. कोहलीने धोनीचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूवर घातक चार्ल्सला चालते केले. मात्र, त्यानंतर सिमन्स आणि विस्फोटक आंद्रे रसेलने मैदानात चौफेर फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजने घेतला होता. भारतीय संघात शिखर धवन ऐवजी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. रहाणेने आपली निवड सार्थ ठरवत संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचली. रोहित शर्माने डावाची तडफदार सुरूवात करून देत ३१ धावांत ४३ धावा ठोकल्या. सामन्याच्या १६ व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्यचा ड्वेन ब्रावोने सीमारेषेवर झेल टिपला. त्यानंतर मैदानात विराट आणि कर्णधार धोनी जोरदार फटकेबाजी कायम ठेवून वीस षटकांच्या अखेरीस संघाला १९२ चा आकडा गाठून दिला. विराटने आपला फॉर्म कायम राखत याही सामन्यात आपल्या अप्रतिम फटक्यांचा नजराणा पेश करत ४७ चेंडूत नाबाद ८९ धावा ठोकल्या, तर कर्णधार धोनीने नाबाद १५ धावांचे योगदान दिले होते.
Live Cricket Updates of India vs West Indies:
# भारताचे आव्हान संपुष्टात, वेस्ट इंडिजचा भारतावर सात विकेट्सने विजय. लेंडन सिमन्सच्या ५१ चेंडूत नाबाद ८३ धावा.
# विराट कोहली टाकतोय सामन्याचे शेवटचे षटक
# धोनीने शेवटचे षटक टाकण्यासाठी पुन्हा विराट कोहलीला पाचारण केले.
# वेस्ट इंडिजला विजयासाठी ६ चेंडूत ८ धावांची गरज
# सामन्याचे १९ वे षटक टाकतोय रवींद्र जडेजा, पहिल्या चार चेंडूत दिल्या केवळ चार धावा, पण पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार
# वेस्ट इंडिजला विजयासाठी १२ चेंडूत २० धावांची गरज.
# सामन्याचे १८ वे षटक टाकतोय बुमराह पहिले तीन चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाचा सीमारेषेवर अप्रतिम झेल. मात्र, पाच सीमारेषेला टेकल्याने सिमन्स नाबाद आणि वेस्ट इंडिजच्या खात्यात सहा धावा.
# वेस्ट इंडिजला विजयासाठी १८ चेंडूत ३२ धावांची गरज
# सिमन्स आणि रसेलची फटकेबाजी, नेहराच्या अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजच्या १० धावा.
# वेस्ट इंडिजला विजयासाठी २४ चेंडूत ४२ धावांची गरज
# सोळावे षटक टाकतोय जसप्रीत बुमराह, वेस्ट इंडिजला विजयासाठी २७ चेंडूत ५० धावांची गरज
# लेंडन सिमन्सला पुन्हा एकदा जीवनदान, झेलबाद झाला होता, मात्र ‘नो बॉल’मुळे सिमन्स पुन्हा एकदा मैदानात
# लेंडन सिमन्सचे ३५ चेंडूत अर्धशतक
# चार्ल्स बाद झाल्यानंतर विस्फोटक आंद्रे रसेल मैदानात, हार्दिक पंड्याला खेचला खणखणीत षटकार
# उत्कृष्ट फलंदाजीनंतर विराटची गोलंदाजीतही दाखवली कमाल, केवळ चार धावा देऊन घेतली एक महत्त्वपूर्ण विकेट
# विराटने पहिल्याच चेंडूवर भारताला मिळवून दिले यश, घातक जॉन्सन चार्ल्स झेलबाद
# तेरावे षटक टाकतोय विराट कोहली
# धोनीने संपूर्ण स्टेडियममध्ये नजर फिरवल्यानंतर तेरावे षटक टाकण्यासाठी कोहलीला पाचारण केले.
# चार्ल्ससोबत सिमन्सचीही फटकेबाजी, वेस्ट इंडिज २ बाद ११६ धावा.
# जॉन्सन चार्ल्सचे ३० चेंडूत दमदार अर्धशतक
# वेस्ट इंडिजचे सामन्यात पुनरागमन, सिमन्स आणि चार्ल्सची तुफान फटकेबाजी.
# दहा षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिजच्या २ बाद ८४ धावा. (चार्ल्स- २३*, चार्ल्स- ४५*)
# चार्ल्स आणि सिमन्सने वेस्ट इंडिजचा डाव सावरला, आठ षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज २ बाद ५९ धावा
# सात षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज २ बाद ५१ धावा
# अश्विनच्या गोलंदाजीवर बुमराहने सिमन्सचा अप्रतिम झेल टिपला, पण चेंडू नो बॉल दिल्याने सिमन्स पुन्दा मैदानात.सिमन्सला जीवनदान
Can you believe it? #IND think they have Simmons caught, but it’s a no-ball!
LIVE: https://t.co/3WCHLIYDks #WT20 pic.twitter.com/Rg7MiHNgts
— ICC (@ICC) March 31, 2016
# सहाव्या षटकात सिमन्सचा उत्तुंग षटकार, वेस्ट इंडिज २ बाद ४४ धावा.
# पाच षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज २ बाद ३३ धावा. (सिमन्स- ४*, चार्ल्स- १५* )
# चार षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज २ बाद २८ धावा.
# वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, सॅम्युअल्स झेलबाद. रहाणेने टिपला झेल
# भारताला मोठे यश, बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेल क्लिन बोल्ड. अप्रतिम यॉर्करवर ख्रिस गेलची विकेट
# आशिष नेहराच्या पहिल्या षटकात वेस्ट इंडिजचा ६ धावा
# आशिष नेहराच्या पाचव्या चेंडूवर गेलने ठोकला चौकार
# वेगवान गोलंदाज आशिष नेहरा घेऊन येतोय पहिले षटक
# सामन्याच्या दुसऱया डावाला सुरूवात, ख्रिस गेल आणि जॉन्सन चार्ल्स मैदानात दाखल
# ख्रिस गेलला भारतीय गोलंदाज स्वस्तात गुंडाळणार का? मत नोंदवा-
Take Our Poll# कोहलीची आणखी एक वादळी खेळी, कोहलीने ठोकल्या ४७ चेंडूत नाबाद ८९ धावा
# कोहलीची जोरदार फटकेबाजी, शेवटच्या षटकात १२ धावा
# सामन्याचे शेवटचे षटक शिल्लक, भारत ्२ बाद १८० धावा
# कोहलीचा उत्तुंग षटकार, त्यानंतर लागोपाठ दोन खणखणीत चौकार
# शेवटच्या दोन षटकांचा खेळ बाकी, भारत २ बाद १५७ धावा
# विराट कोहलीचे ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण, भारत २ बाद १५० धावा.
# कोहली आणि धोनीचा उत्तम ताळमेळ, जोरदार फटकेबाजी
# रहाणे बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात दाखल
# भारताला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणेचा सीमारेषेवर ब्रावोने झेल टिपला.
# १५ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद १२७ धावा ( अजिंक्य- ४०, विराट- ४०)
# विराटचा कव्हर्सच्या दिशेने शानदान चौकार, भारत १ बाद ११४ धावा.
# विराट आणि अजिंक्यचा मैदानात सुयोग्य ताळमेळ
# १२ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ९८ धावा
# अकराव्या षटकात पाच धावा, भारत १ बाद ९१ धावा (अजिंक्य- ३१*, कोहली -१४* )
# रहाणेचा खणखणीत चौकार, दहा षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ८६ धावा
# कोहीलचा दमदार चौकार, ९ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ७६ धावा.
# दोन धावा घेण्याच्या नादात पुन्हा एकदा कोहलीला जीवनदान
# कोहलीला चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत होताना जीवनदान
# सात षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ६६ धावा.
# रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात, चाहत्यांचा जल्लोष
# सातव्या षटकात भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा ४३ धावांवर बाद
# सहा षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद ५५ धावा. (रोहित-४३* , अजिंक्य- १३*)
# रोहित आणि अजिंक्यची अर्धशतकी भागीदारी, भारत बिनबाद ५५ धावा
# पाच षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद ३५ धावा. (रोहित-२३* , अजिंक्य- ११*)
# अजिंक्य रहाणेच्या खात्यात चौकार
# रोहितचा आणखी एक चौकार, भारत बिनबाद २५ धावा.
India need their best start in this tournament to set themselves up for a good score. #IndvsWI #AKLive #WT20
— Anil Kumble (@anilkumble1074) March 31, 2016
# चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दमदार चौकार, भारत बिनबाद २१ धावा.
# चौथे षटक घेऊन येतोय फिरकीपटू सुलेमान बेन, पहिल्या चेंडूवर दोन धावा
# तीन षटकाच्या अखेरीस भारताच्या बिनबाद १५ धावा
# रोहित शर्माचा तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार
# दुसऱया षटकात ४ धावा (रोहित-१* , अजिंक्य- ३*)
# सामन्याचे दुसरे षटक टाकतोय फिरकीपटू सॅम्युअल बद्री
# पहिल्या षटकात भारताच्या २ धावा. (रोहित-१* , अजिंक्य- १*)
# पहिल्या षटकाच्या तिसऱया चेंडूवर भारतीय संघाच्या धावसंख्येचे खाते उघडले
# मुंबईकर जोडी मैदानात दाखल, अजिंक्य आणि रोहित करणार भारताच्या डावाची सुरूवात.
# भारताच्या राष्ट्रगीताला सुरूवात.
# वेस्ट इंडिजच्या राष्ट्रगीताला सुरूवात.
# दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात दाखल.
# भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल, शिखर धवनला आराम देऊन अजिंक्य रहाणेला संधी. युवराजच्या जागी मनिष पांडेचा संघात समावेश.
# वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
# दोन्ही संघांचे कर्णधार मैदानात नाणेफेकीसाठी दाखल
# अशी आहे वानखेडेची खेळपट्टी..
#WT20: Here’s how the pitch is looking for the 2nd semi-final between #Ind and #WI pic.twitter.com/0rs5dftsiD
— BCCI (@BCCI) March 31, 2016
# महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे थोडं वळूया. न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने सहा विकेट्सने विजय प्राप्त केला. वेस्ट इंडिजचा महिला संघ पहिल्यांदाच टवेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे.
# Watch: India vs West Indies Semi Final it’s all about ‘All Rounders’
# भारतीय संघ वानखेडे स्टेडियमच्या दिशेन रवाना..
LIVE on #Periscope: Pre-semi-final vibes as #TeamIndia walk out of the team hotel for the Wankhede stadium #INDvWI … https://t.co/Jl6lfeLm14
— BCCI (@BCCI) March 31, 2016
# उपांत्य फेरीच्या लढतीसाठी वेस्ट इंडिजचा कसून सराव सुरू आहे.
It will be a huge occasion in Mumbai tonight. See how the @westindies have been preparing for the #WT20 Semi Final!https://t.co/PeUFluqbYm
— ICC (@ICC) March 31, 2016
# दरम्यान, ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱयांचा यादीत कोणते खेळाडू आहेत ते पाहू. विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. Find out here
# युवराजची दुखापत बळावली असल्याची माहिती मिळत असून तो आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
# वानखेडेवर सुरू होणाऱया महामुकाबल्याला केवळ पाच तास बाकी
# वेस्ट इंडिज आणि भारत या दोन्ही संघांनी याआधी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.
# २०१२ साली वेस्ट इंडिजने टी-२० चा विश्वचषक उंचावला होता.
# Watch: India vs West Indies Semi Final ICC WT20 Preview
# भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीच्या दोन्ही वेळी भारताने उपांत्य फेरी जिंकली आहे.
# स्वप्न चालून आले बघता बघता..
# वेस्ट इंडिजचा संघ देखील या सामन्यात विजयी निर्धाराने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.