भारत आणि बांगलादेश सामन्यानंतर हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याच्या नावाची प्रचंड चर्चा रंगली आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्याशी संबंधित काही नवनवीन गोष्टी समोर येताना दिसत आहेत. यामध्ये हार्दिक पांड्याच्या ‘लव्ह लाईफ’चा मुद्दा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरत आहे. भारत-बांगलादेश सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा एका मॉडेलसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे हार्दिक पंड्याला क्लीन बोल्ड करणारी ही तरूणी कोण आहे, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. या तरूणीचे नाव लिशा शर्मा असून ती कोलकत्यामधील एक प्रतिथयश मॉडेल आहे. हार्दिक आणि लिशा गेल्या अनेक वर्षांपासून डेटिंग करत असल्याची एका इंग्रजी दैनिकाची माहिती आहे. या माहितीनुसार, हार्दिक आणि लिशा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून ते अनेकदा कोलकत्यामधील मॉल्स आणि हॉटेल्समध्ये एकत्र दिसून आले आहेत. ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत लिशाने पांड्या हा शांत स्वभावाचा, परिपूर्ण आणि जमिनीवर पाय असलेला माणूस असून आम्ही दोघे खूप चांगले मित्र असल्याचे सांगितले. तुम्ही केवळ मित्रच आहात की मैत्रीच्याही पुढे तुमच्यात काही आहे , असा प्रश्नही यावेळी लिशाला विचारण्यात आला.त्याला उत्तर देताना सध्यातरी आम्ही फ्रेंड्स म्हणूनच ठीक आहोत, असे लिशाने सांगितले. याशिवाय, पंड्या सुटेबल बॉय आहे का, याविषयी विचारण्यात आले असता आज संपूर्ण देश त्याच्यासोबत डेटवर जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तो एक ‘डेटिंग मटेरियल’ असल्याचे लिशाने लाजत सांगितले.

Story img Loader