Live Cricket Score, India vs Australia: ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महामुकाबल्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा संघाला तारले. कोहलीच्या ५१ चेंडूत नाबाद ८२ धावांच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे १६१ धावांचे आव्हान पाच चेंडू राखून गाठले. सामन्याच्या १६ व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड होते. (Full Coverage || Fixtures || Photos)
भारताला विजयासाठी प्रत्येक षटकामागे १२ च्या सरासरीने धावा होत्या. पण मैदानात विराट कोहली मैदानाता उभा असल्याने भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. कोहलीने सामन्याच्या १७ व्या षटकापासून धारण केलेल्या रौद्र रुपाने सामन्याचा कल पालटला. भारताला १८ चेंडूत ३९ धावांची गरज असताना कोहलीने आपल्या भात्यातील अफलातून फटक्यांचा नजराणा पेश करत चौफेर फटकेबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीने १९ व्या षटकात फॉकनरला ४ खणखणीत चौकार ठोकले आणि अखेरच्या षटकात विजयासाठी चार धावांची गरज असताना धोनीने चौकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या या विजयानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला. संपूर्ण स्टेडियमवर कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू झाला. संघ बिकट स्थितीत असताना संयमी फलंदाजी करून मैदानात टिच्चून फलंदाजी करणे आणि संघासाठी विजयश्री खेचून आणण्याचे आपले कसब कोहलीने पुन्हा एकदा दाखवून दिले. भारताने या विजयासह स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, भारताची गाठ आता वेस्ट इंडिजशी असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना ३१ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

दरम्यान, सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १६१ धावांचे आव्हान ठेवले होते.
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरूवात करुन दिली होती. सुरूवातीच्या फटकेबाजीनुसार ऑस्ट्रेलिया आज दोनशेचा आकडा गाठणार अशी चिन्हे दिसत असताना आशिष नेहराने सामन्याच्या चौथ्या षटकात संघाला पहिले यश मिळवून दिले. नेहराने ख्वाजाला चालते केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला अश्विनने, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला स्वस्तात माघारी धाडले. यामुळे भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करता आले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला. सामन्याच्या पहिल्या षटकापासून तुफान फटकेबाजी करत असलेला आरोन फिन्च(४३) हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. मॅक्सवेलचा(३१) अडथळा बुमराने दूर केला. सामन्याच्या अखेरच्या षटकांत शेन वॉटसन आणि पीटर नेव्हिलने चांगली फलंदाजी करून संघाला १६० चा आकडा  गाठून दिला.

LIVE UPDATES:

# कोहलीने पुन्हा एकदा करुन दाखवले, भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सने विजय

# कोहलीची चौकारांची आतषबाजी, भारताला विजयासाठी ६ चेंडूत ४ धावांची गरज

# १९ व्या षटकात कोहलीची तुफान फटकेबाजी, भारताला विजयासाठी ९ चेंडूत १२ धावांची गरज

# अठराव्या षटकात भारताने कुटल्या १९ धावा.

# अठराव्या षटकात कोहलीची जोरदार फटकेबाजी, भारताला विजयासाठी १२ चेंडूत २० धावांची गरज.

# भारताला विजयासाठी १४ चेंडूत २३ धावांची गरज

# कोहलीचा उत्तुंग षटकार, भारताला विजयासाठी १५ चेंडूत २५ धावांची गरज.

# कोहलीचे दोन लागोपाठ दमदार चौकार, भारताला विजयासाठी १६ चेंडूत ३१ धावांची गरज

# भारताला विजयासाठी १८ चेंडूत ३९ धावांची गरज.

# कोहलीचे अर्धशतक पूर्ण.

# विराट कोहलीची फटकेबाजी, भारत ४ बाद ११० धावा. भारताला विजयासाठी २४ चेंडूत ४७ धावांची गरज

# १५ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ४ बाद १०२, विजयासाठी ३० चेंडूत ५९ धावांची गरज.

# शेट वॉटसनच्या गोलंदाजीवर धोनीचा चौकार, भारत ४ बाद १०० धावा.

# युवराज सिंग(२१) झेलबाद, वॉटसनने टिपला झेल. भारत ४ बाद ९४ धावा.

# ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झम्पाच्या फूलटॉस चेंडूवर युवराजचा षटकार, भारत ३ बाद ८७ धावा.

# १२ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ८० धावा. (कोहली- ३०*, युवराज- १३*)

# कोहलीचा मॅक्सवेलला उत्तुंग षटकार. भारत ३ बाद ७५ धावा.

# ११ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ६८ धावा. (कोहली- २०*,  युवराज- ११*)

# पायाच्या दुखापतीमुळे युवराजला धावा घेताना अडथळे.

# नऊ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ३ बाद ५९ धावा.

# युवराजच्या पायाला दुखापत.

# भारताला तिसरा झटका, सुरेश रैना यष्टीरक्षक पीटर नेव्हिलकरवी झेलबाद.

# सातव्या षटकात भारताच्या आठ धावा. (रैना- ७*, कोहली-१२*)

# सहाव्या षटकाच्या अखेरीस भारत २ बाद ३७ धावा. सुरेश रैना आणि विराट कोहली मैदानात.

# सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड.

# कोहलीचा कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत १ बाद ३३ धावा.

# कोहली मैदानात येताच दुसऱयाच चेंडूवर शानदार चौकार. भारत १ बाद २९ धावा.

# भारताला पहिला धक्का, शिखर धवन झेलबाद

# धवनपाठोपाठ रोहित शर्माचीही फटकेबाजी, खणखणीत चौकार. भारत बिनबाद २२ धावा.

# तिसऱया षटकाच्या दुसऱया चेंडूवर हॅझलवूडला शिखर धवनने खेचला उत्तुंग षटकार, भारत बिनबाद १६ धावा.

# दुसऱया षटकात फक्त २ धावा.

# पहिल्या षटकात भारताच्या बिनबाद ७ धावा.

# शिखर धवनचा कव्हर्सच्या दिशेने खणखणीत चौकार.

# सामन्याच्या दुसऱया डावाला सुरूवात. सामना भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीचे तिकीट पक्के

# भारताचे सलामीवर रोहित आणि शिखर मैदानात.

# POLL

Take Our Poll

# ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर १६१ धावांचे आव्हान.

# पीटर नेव्हिलने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर खेचला षटकार, ऑस्ट्रेलिया ६ बाद १६० धावा.

# २० व्या षटकात हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर फॉकनर झेलबाद.

# १९ व्या षटकात बुमराहने दिल्या ९ धावा, शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माचे अप्रतिम क्षेत्ररक्षण. ऑस्ट्रेलिया ५ बाद १४५ धावा.

# १८ व्या षटकात आशिष नेहराने दिल्या फक्त ४ धावा, ऑस्ट्रेलिया ५ बाद १३६ धावा.

# शेवटच्या तीन षटकांचा खेळ शिल्लक, ऑस्ट्रेलिया ५ बाद १३१ धावा.

# मॅक्सवेलचा अडथळा जसप्रीम बुमराहने केला दूर, मॅक्सवेल ३१ धावांवर बोल्ड.

# जडेजाच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी, रिव्हर्स स्वीप फटका. ऑस्ट्रेलिया १६ षटकांच्या अखेरीस ४ बाद १२३ धावा.

# १४ षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया ४ बाद १०४ धावा (वॉटसन- ०* , मॅक्सवेल- १६* )

# शेट वॉटसन मैदानात दाखल.

# भारतीय संघाला मोठे यश, घातक अारोन फिन्च ४३ धावांवर बाद, मोठा फटका मारण्याच्या नादात फिन्च झेलबाद. हार्दिक पंड्याने घेतली विकेट.

# सीमारेषेवर सुरेश रैनाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, ऑस्ट्रेलिया ३ बाद ९३ धावा.

# हार्दिक पंड्याच्या पहिल्या षटकात केवळ चार धावा, ११ षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया ३ बाद ८५ धावा.

# ऑस्ट्रेलिया ३ बाद ७५ धावा.

# धोनीने युवराजला दिली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर युवराजने घेतली कर्णधार स्मिथची विकेट

# रवींद्र जडेजाची अचूक गोलंदाजी, नवव्या षटकात केवळ १ धाव.

# आठ षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद ७३ (फिंच- ३२*, स्टीव्ह स्मिथ- १*)

# भारताला दुसरे यश, घातक डेव्हिड वॉर्नर बाद. स्टेडियमवर एकच जल्लोष. अश्विनने घेतली विकेट.

# फलंदाजी पावर प्लेच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया १ बाद ५९ धावा. (वॉर्नर-२* , फिंच- २४*)

# पाच षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया १ बाद ५५ धावा.

# टीम इंडियाला पहिले यश, घातक उस्मान ख्वाजा (२६) बाद. नेहराच्या गोलंदाजीवर धोनीने टिपला झेल.

# अश्विनच्या षटकात अरोन फिंचने ठोकले दोन उत्तुंग षटकार, चार षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया बिनबाद ५३ धावा.

# तिसऱया षटकातही उस्मान ख्वाजा आणि फिंचची फटकेबाजी, ऑस्ट्रेलिया बिनबाद ३० धावा

# सामन्याच्या दुसऱया षटकात बुमराहला ऑस्ट्रेलियाच्या सलामीवरांनी कुटल्या तब्बल १७ धावा. ऑस्ट्रेलिया बिनबाद २१ धावा.

# आशिष नेहराच्या पहिल्या षटकात केवळ चार धावा.

# ऑस्ट्रेलियाचे सलामीवर मैदानात दाखल, पहिले षटक घेऊन येतोय आशिष नेहरा

# भारतातच्या राष्ट्रगीताला सुरूवात

# ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताला सुरूवात.

# राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात.

# ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, फलंदाजी निर्णय

# थोड़्याच वेळात सामन्याचा नाणेफेक होणार.

# Watch: India vs Australia World T20 Preview from Mohali

# ऑस्ट्रेलियाच सामना जिंकणार असा मिचेल जॉन्सनला विश्वास.

# मोहालीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला चांगली मदत करेल असे म्हटले जात आहे.

# ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत चार वेळा एकमेकांसमोर आले असून, दोन सामने भारताने, तर दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार यात काहीच शंका नाही.

# ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे याआधीचे पाचही सामना भारताने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.