ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी घोडदौडीला लगाम घातला. इंग्लंडने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत न्यूझीलंडवर सात विकेट्सने मात केली.
न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे आव्हान इंग्लंडने १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत गाठले. इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉय विजयाचा शिल्पकार ठरला. रॉयने २ षटकार आणि ११ चौकारांच्या आतषबाजीसह केवळ ४० चेंडूत ७८ धावा ठोकल्या, तर हेल्सनेही त्याला साजेशी साथ देत २० धावांचे योगदान दिले. सलामीजोडी तंबूत दाखल झाल्यानंतर कर्णधार इऑन मार्गन शून्यावर माघारी परतला. त्यानंतर जो रुट (२७ नाबाद) आणि जोस बटलरने(३२ नाबाद) संघाची मदार सांभाळत संघाला विजय प्राप्त करून दिला. ( Full coverage || Fixtures || Photos)
दरम्यान, या सामन्याचा नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. न्यूझीलंडला वीस षटकांत १५४ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर उभे करता आले. न्यूझीलंडच्या सलामीवरांनी जोरदार फटकेबाजीने सुरूवात केली होती. पण तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्तील मोठा फटका मारण्याच्या नादत बाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि कॉलिन मुर्नो यांनी जोरदार फटकेबाजी करून अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, विल्यमसन (३२) मोठी खेळी साकारण्यास अपयशी ठरला. विल्यमसन अकराव्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विल्यमसन माघारी परतल्यानंतर चौदाव्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. मैदानात जम बसवलेला कॉलिन मुर्नो ४६ धावा ठोकून माघारी परतला. लायम प्लंकेटने मुर्नोची विकेट घेतली. अखेरच्या षटकांत मोठे फटके मारण्याच्या नादात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अक्षरश: विकेट्स टाकल्या. त्यामुळे वीस षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडला १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

LIVE UPDATES:

# जोस बटलरचा विजयी षटकार, इंग्लंडचा ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश. न्यूझीलंडवर सात विकेट्सने मात.

# जोस बटलरचा सतराव्या षटकाच्या तिसऱया चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर आणखी एक खणखणीत षटकार इंग्लंडला विजयासाठी हवी केवळ १ धाव

# जो रुटचा सतराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार, इंग्लंडला विजयासाठी १९ धावांची गरज

# जो रुट आणि जोस बटलर यांची मैदानात संयमी फलंदाजी. इंग्लंडला विजयासाठी २९ चेंडूत २९ धावांची गरज

# इंग्लंडला विजयासाठी ३६ चेंडूत ३३ धावांची गरज

# १४ षटकांच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या ३ बाद १२१

# सोधीची फिरकी जादू, रॉयपाठोपाठ पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन बाद.

# न्यूझीलंडला मोठे यश, जेसन रॉयचा अडसर इश सोधीने केला दूर. जेसन रॉयचे ४४ चेंडूत ७८ धावांचे योगदान.

# अकरा षटकांच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या १ बाद १०३ धावा. जेसन रॉयच्या ४० चेंडूत ७६ धावा. न्यूझीलंडला विजयासाठी ५४ चेंडूत ५१ धावांची गरज.

# इंग्लंडच्या धावसंख्येचे अकराव्या षटकाच्या दुसऱया चेंडूवर शतक

# जेसन रॉयचा खणखणीत फ्लॅट षटकार, न्यूझीलंड १ बाद ९८ धावा.

# जेसन रॉयची फटकेबाजी मात्र कायम, सँटनरला ठोकला दमदार चौकार

# हेल्स बाद झाल्यानंतर जो रुट फलंदाजीसाठी मैदानात दाखल.

# विकेट पडल्यानंतर मैदानात प्रेक्षकांनी केलेला जल्लोष

# ९ व्या षटकात न्यूझीलंडला यश, अॅलेक्स हेल्स २० धावांवर झेलबाद.

# आठव्या षटकात केवळ चार धावा. इंग्लंड बिनबाद ७९ धावा.

# सात षटकांच्या अखेरीस इंग्लंड बिनबाद ७५ धावा. (रॉय- ५५* , हेल्स- १८*)

# इंग्लंडच्या जेसन रॉयच्या २६ चेंडूत ५० धावा.

# सहा षटकांच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ६६ (रॉय- ४८*, हेल्स- १६*)

# सहाव्या षटकात पहिल्या चार चेंडूत केवळ दोन धावा, पाचव्या चेंडूवर रॉयचा चौकार, अखेरच्या चेंडूवर १ धाव.

# पाच षटकांच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ६० ( रॉय- ४३* , हेल्स- १५*)

# जेसनचा आणखी एक अप्रतिम चौकार, इंग्लंड बिनबाद ५८ धावा.

# जेसन रॉयचा मिचेल सँटनरला स्ट्रेट ड्राईव्ह चौकार

# जेसन रॉयचा उत्तुंग षटकार, चार षटकांच्या अखेरीस इंग्लंड बिनबाद ४९ धावा.

# चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने हेल्सचा शानदार चौकार

# जेसन रॉयच्या अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हने तिसऱया षटकाची समाप्ती. इंग्लंड बिनबाद ३६ धावा.

# अॅलेक्स हेल्सचा मिचेल मॅक्लेघनला खणखणीत षटकार

# दोनशेच्या सरासरीने जेसन रॉयची फटकेबाजी. इंग्लंड बिनबाद २४ धावा

# दोन षटकांच्या अखेरीस इंग्लंड बिनबाद २३ धावा. (रॉय- २२* , अ‍ॅलेक्स हेल्स-१*)

# पहिल्या षटकाच्या अखेरीस इंग्लंड बिनबाद १६ धावा.

# जेसन रॉयची पहिल्या षटकात जोरदार फटकेबाजी, पहिल्या षटकात ठोकले चार चौकार.

# जेसन रॉयचा आणखी एक चौकार

# सामन्याच्या दुसऱयाच चेंडूवर जेसन रॉयचा शानदार स्वेअर ड्राईव्ह, दमदार चौकार

# कोरे अँडरसन घेऊन येतोय पहिले षटक. इंग्लंडसमोर १५४ धावांचे लक्ष्य

# ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीतील दुसऱया डावाला सुरूवात.

# न्यूझीलंडचे १५४ धावांचे आव्हान इंग्लंड गाठू शकेल का? मत नोंदवा-

# इंग्लंडसमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य.

# २० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या ८ बाद १५३ धावा.

# अखेरच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात न्यूझीलंडचा मिचेल मॅक्लेघन धावचीत

# २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा मिचेल सँटनर झेलबाद.

# १९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या ६ बाद १५०.

# १९ व्या षटकात पहिल्या चार चेंडूमध्ये केवळ तीन धावा, पाचव्या चेंडूवर चौकार आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव.

# स्टोक्सची हॅट्ट्रिकची संधी हुकली. न्यूझीलंड १८ षटकांच्या अखेरीस ६ बाद १४० धावा.

# बेन स्टोक्सला हॅट्ट्रिकची संधी.

# राँचीपाठोपाठ कोरे अँडरसन (२८) देखील झेलबाद. अखेरच्या षटकांत न्यूझीलंडच्या धावसंख्येला ब्रेक.

# मोठा फटका मारण्याच्या नादात ल्यूक राँची स्वस्तात बाद. न्यूझीलंड ५ बाद १३९ धावा.

# इंग्लंडला १७ व्या षटकात यश, घातक रॉस टेलर बाद.

# सामन्याच्या सोळाव्या षटकात अँडरसनची फटकेबाजी. लायम प्लंकेटला ठोकला खणखणीत षटकात. सोळा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद १३३.

# मुर्नो माघारी परतल्यानंतर रॉस टेलर मैदानात. चौदा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ३ बाद १११ धावा. ( रॉस टेलर-१*, कोरे अँडरसन-९* )

# चौदाव्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का, कॉलिन मुर्नो ४६ धावा ठोकून माघारी. प्लंकेटने घेतली विकेट.

# तेरा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद १०६ धावा. (मुर्नो- ४६* , अँडरसन- ६*)

# न्यूझीलंडच्या धावसंख्येचे शतक

# विल्यमसन बाद झाल्यानंतर अष्टपैलू कोरे अँडरसन फलंदाजीसाठी मैदानात.

# केन विल्यमसनने ठोकल्या २८ चेंडूत ३२ धावा.

# अकराव्या षटकात इंग्लंडला मोठे यश न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मोईन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद.

# विल्यमसन, मुर्नोची फटकेबाजी, १० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद ८९ धावा. (विल्यमसन- ३१*, मुर्नो- ३६*)

# स्टोक्सचा फाईन डीपच्या दिशेने आणखी एक चौकार.

# बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर मुर्नोचा ठोकला चौकार.

# रशिदची ओव्हर देखील इंग्लंडला महागात, न्यूझीलंड १ बाद ७८ धावा.

# विल्यमसनचा पॉईंटच्या दिशेने चौकार

# मुर्नोचा रिव्हर्स स्विप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार

# विल्यमसन आणि मुर्नोची ३८ चेंडूत अर्धशतकी भागीदारी. (विल्यमसन- २६*, मुर्नो- २८* )

# विल्यमसनचा स्टोक्सच्या गोलंदाजीवर शानदार षटकार, आठ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद ६५ धावा.

# विल्यमसन नॉट ऑऊट, तिसऱया पंचांचा निर्णय. न्यूझीलंड सात षटकांच्या अखेरीस १ बाद ५५ धावा.

# विल्यमसनच्या धावचीतसाठी अपील, तिसऱया पंचांच्या निर्णयाकडे साऱयांचे लक्ष.

# पहिल्या सहा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या १ बाद ५१. (विल्यमसन- १५*, मुर्नो-१९*)

# सहाव्या षटकात मुर्नोची फटकेबाजी पहिल्या चेंडूवर लागोपाठ तीन चौकार

# पाच षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद ३८ धावा.

# फाईन लेगच्या दिशेने विल्यमसनचा शानदार चौकार, न्यूझीलंड १ बाद ३७ धावा.

# कर्णधार केन विल्यमसन आणि कॉलिन मुर्नोची फटकेबाजी. न्यूझीलंड चार षटकांच्या अखेरीस १ बाद ३१ धावा.

# तिसऱया षटकाच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद २३ धावा.

# तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला यश, मार्टिन गप्तिल (१५) बाद

# दुसऱया षटकात सहा धावा, न्यूझीलंड बिनबाद १७ धावा.

# पहिल्या षटकात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी ठोकल्या ११ धावा.

# न्यूझीलंड पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद ११ धावा. (गप्तिल- १०* , विलियम्सन- १*)

# दोन्ही संघांचे राष्ट्रगीत

# इंग्लंडने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

# Watch:  England vs New Zealand ICC WT20 Semi Final 2016 Preview  

Story img Loader