ट्वेन्टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या संघाने भारतीय संघावर मात करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताच्या या पराभवाची बांगलादेशचा खेळाडू मुशफिकूर रहीम याने ट्विटवर खिल्ली उडवली. मात्र, नेटिझन्सने मुशफिकूरच्या ट्विटरवर संताप व्यक्त केल्यानंतर त्याने आपले ट्विट मागे घेत माफीनामा सादर केला. ( Full Coverage || Trending || Photos )
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध सात विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या पराभवानंतर मुशफिकूरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर, ‘हा आहे.. आनंदाचा क्षण..हाहाहा!!, भारताचा उपांत्य फेरीत पराभव..’ असे ट्विटकरून वाद ओढावून घेतला. या ट्विटसोबत सामना संपल्यानंतर धोनी समालोचकाच्या प्रश्नांना उत्तरं देत असतानाचा फोटो देखील ट्विट केला होता.
मुशफिकूरच्या या कृत्यावर नेटिझन्सनी चहूबाजूंनी टीका केल्यानंतर त्याने ट्विट मागे घेऊन माफीनामा सादर करणारे ट्विट केले. ‘मी सर्वांची माफी मागतो.. मी वेस्ट इंडिजचा चाहता आहे, पण माझ्याकडून वापरल्या गेलेल्या कठोर शब्दांबद्दल मी माफी मागतो’, असे ट्विट त्याने केले.
Sorry to all of you guys…as i am a big West Indies supporter but anyway sorry again for some harsh words…!!!!
— Mushfiqur Rahim (@mushfiqur15) March 31, 2016