पाकिस्तान संघाने विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत केलेल्या निराशाजनक कामगिरी केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांनी सांगितले.
पाकिस्तानचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले तसेच त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडूनही पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानला साखळी गटात केवळ बांगलादेशवर मात करता आली होती. अन्य सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यामुळे संघातील खेळाडू तसेच प्रशिक्षकांवर सातत्याने टीका केली जात आहे. वकार यांच्या प्रशिक्षकपदाची मुदत मे महिन्यात संपणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वकार म्हणाले, ‘‘संघाच्या खराब कामगिरीबाबत मी देशाची माफी मागत आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी लक्षात घेता मी पदाचा त्याग करण्यास तयार आहे. जर माझ्या राजीनाम्यामुळे संघाचा लाभ होणार असेल तर ते स्वीकारण्यास मी तयार आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यांच्या स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्यास तयार – युनूस
निराशाजनक कामगिरी केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे,
आणखी वाचा
First published on: 30-03-2016 at 06:10 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan coach waqar younis offers resignation after defeat in icc t20 world cup