पाकिस्तान संघाने विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत केलेल्या निराशाजनक कामगिरी केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांनी सांगितले.
पाकिस्तानचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले तसेच त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडूनही पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानला साखळी गटात केवळ बांगलादेशवर मात करता आली होती. अन्य सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यामुळे संघातील खेळाडू तसेच प्रशिक्षकांवर सातत्याने टीका केली जात आहे. वकार यांच्या प्रशिक्षकपदाची मुदत मे महिन्यात संपणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वकार म्हणाले, ‘‘संघाच्या खराब कामगिरीबाबत मी देशाची माफी मागत आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी लक्षात घेता मी पदाचा त्याग करण्यास तयार आहे. जर माझ्या राजीनाम्यामुळे संघाचा लाभ होणार असेल तर ते स्वीकारण्यास मी तयार आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यांच्या स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा