क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे माजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे. त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या कामाचा मागोवा घेणारा एक छोटेखानी कार्यक्रम या वेळी ईडन गार्डन्सवर होणार आहे. महिलांचा सामना संपल्यावर हा पाच मिनिटांचा कार्यक्रम होईल. यामध्ये दालमिया यांच्या कामाला उजळणी देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. भारतीय संघ अंतिम फेरीत नसल्याने सर्वाचाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे कोणताच मोठा कार्यक्रम अंतिम फेरीच्या वेळी करण्यात येणार नाही. विंडीज-इंग्लंड यांच्या सामन्यातील मध्यंतराच्या वेळी पाच मिनिटांचा पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

अंतिम फेरीची दर्दी चाहत्यांना संधी

अंतिम सामन्यांच्या तिकिटांसाठी जास्त मागणी नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. पण शनिवारी येथील स्थानिक दर्दी चाहत्यांनी अंतिम फेरीच्या तिकिटांसाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्याचबरोबर ‘कॅब’ने आपल्या सदस्यांना आणि अन्य क्लब्जना अतिरिक्त तिकीट्स दिल्या आहेत. त्यामुळे हे स्टेडियम ९० टक्के भरलेले दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader