ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि त्याआधी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत कर्णधार शाहिदी आफ्रिदी गांभीर्याने सहभागी झाला नाही असा आरोप पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनिस यांनी आपल्या अहवालात केला आहे. युनिस यांचा गोपनीय अहवाल प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचला. यावरही युनिस यांनी ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.
‘विश्वचषकादरम्यान आफ्रिदी नेतृत्त्व तसेच संघाच्या प्रदर्शनाबाबत गंभीर नव्हता. संघबैठका आणि सराव शिबिरांना तो सातत्याने अनुपस्थित होता’, असे युनिस यांनी म्हटले आहे.
अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हफीझने आपल्या गुडघ्याच्या दुखापतीविषयी संघाला अंधारात ठेवले असा आरोपही युनिस यांनी केला आहे.
युनिस आणि आफ्रिदी यांच्यात वादाची ठिणगी उडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०११ मध्ये या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता.

Story img Loader