आशिया चषक व ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत संघाला साखळी गटातच पराभव स्वीकारावा लागला असला तरी मी राजीनामा देणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले.

पाकिस्तानला या दोन्ही स्पर्धामध्ये  पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडूनही पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शहरयार हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची अफवा निर्माण झाली होती. मात्र शहरयार यांनी सांगितले, ‘की या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. दोन्ही स्पर्धामधील संघाच्या कामगिरीबाबत माझ्याकडे अहवाल आले आहेत, ते पाहून योग्य वेळी मी  मत व्यक्त करीन.’

Story img Loader