विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्याने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सोमवारी होणारी ही लढत औपचारिक स्वरूपाची असणार आहे. या दोन्ही संघांना विजय किंवा पराभव मिळवल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, फक्त अखेरचा सामना जिंकून मायदेशी परतू शकलो, एवढाच काय तो आनंद त्यांना मिळू शकणार आहे.
शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दहा धावांनी पराभूत झाल्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्याचबरोबर त्यांच्या गोलंदाजीमध्येही धार दिसली नाही. त्यामुळे अखेरचा सामना त्यांना जिंकायचा असेल तर त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागेल.
आफ्रिकेला फलंदाजीमध्ये सातत्य राखता आले नाही. फलंदाजांची मांदियाळी असताना नावाजलेल्या फलंदाजांकडून सुमार कामगिरी झाली. गोलंदाजीमध्येही त्यांना सूर गवसल्याचे पाहायला मिळाले नाही. दरम्यान महिला गटातही आव्हान संपुष्टात आलेल्या द. आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात औपचारिक लढत होणार आहे.

Story img Loader