विश्वचषकात उपांत्य फेरीत वाटचालीच्या आशा संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका महिला संघांमध्ये औपचारिक लढत रंगणार आहे. दमदार विजय मिळवत सन्मान वाचवण्याची दोन्ही संघांना संधी आहे. डेन व्हॅन निइकर्क, त्रिशा चेट्टी, लिझेल ली यांच्यावर दक्षिण आफ्रिकेची भिस्त आहे. दुसरीकडे कर्णधार शशिकला सिरीवर्दने दुखापतग्रस्त झाल्याने श्रीलंकेचे आव्हान कमकुवत झाले आहे. चामरी अट्टापटू, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, दिलानी मंडोदरा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी ही चौकडी उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव बाजूला सारत विश्वचषक अभियानाचा शेवट विजयाने करण्याची संधी श्रीलंककडे आहे.
संघ
दक्षिण आफ्रिका : मिगनॉन डय़ू प्रीझ (कर्णधार), मोसलिन डॅनियल्स, योलानी फौरी, मॅरिझान काप, लिझेल ली, सुन ल्युस, डेन व्हॅन निइकर्क, त्रिशा चेट्टी, दिनेशा देवनरिन, शबनिम इस्माइल, अयाबोंगा खाका, मासाबाटा लास, मार्सिआ लेटसालो, चोल टायरॉन, ओडिन कर्स्टन.
श्रीलंका : शशिकला सिरीवर्दना (कर्णधार), नीलाक्षी डी सिल्व्हा, अमा कांचना, इशानी लोकूसुरियागे, हर्षिता मडावी, उदेशिका प्रबोधिनी, इनोका रणवीरा, प्रसादिनी वीराकोड्डी, चामरी अट्टापटू, निपुणी हंसिका, हंसिमा करुणारत्ने, सुगंदिका कुमारी, यसोदा मेंडिस, ओशादी रणसिंघे, दिलानी मंडोदरा.

Story img Loader