नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील खेळाडुंच्या कामगिरीच्याआधारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून (आयसीसी) ट्वेन्टी-२० प्रकारातील विश्व इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची ‘रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय, विश्वचषकात भारतीय गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या आशिष नेहरालाही या संघात स्थान मिळाले आहे. विराट कोहली हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने टी-२० विश्वचषकात खेळलेल्या पाच डावांमध्ये १३६.५०च्या सरासरीने २७३ धावा केल्या. विराट या स्पर्धेत तीन वेळा नाबाद राहिला. त्याचीच दखल घेत आयसीसीने विराटकडे या संघाचे नेतृत्त्व सोपवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा