पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक वासीम अक्रम यांच्या वृत्तवाहिनीवरील लाईव्ह कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी घुसखोरी करत कॅमेरा टीमवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर वासीम अक्रम ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मुंबईतून सहभागी झाले होते. यावेळी ते विराट कोहलीविषयी बोलत असताना अचानक काहीजण त्याठिकाणी आले आणि त्यांनी कार्यक्रमाचे प्रक्षेपण थांबविण्याचा प्रयत्न केला. काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी संघाला मुंबईत पाय ठेवून देणार नाही, असे शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार घडल्याची शंका व्यक्त केली जात होती. मात्र, तसे काहीही घडले नसून यावेळी कोणालाही इजा झाली नसल्याचे वृत्तवाहिनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader