ईडन गार्डन्सवर आज अंतिम फेरीत वेस्ट इंडिजसमोर इंग्लंडचे कडवे आव्हान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रंगुनी रंगात साऱ्या रंग आमचा वेगळा, असे वेस्ट इंडिजच्या संघाच्या बाबतीत म्हणता येईल. ‘कॅलिप्सो’ हा वेस्ट इंडिजचा जगप्रसिद्ध नृत्य प्रकार, पण त्याचे रंग, छटा, संगीत कॅरेबियन बेटांवर वेगवेगळे पाहायला मिळतात. परंतु तरीही जेव्हा वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानावर नृत्य करतात, तेव्हा त्यांचा रंग एकसारखा असतो. कारण क्रिकेटनेच त्यांना एकत्र आणले आहे, ट्वेन्टी-२०चे राजे, असा किताबही त्यांना मिळाला आहे. दुसरीकडे इंग्लंडमध्ये ‘मॉरिस डान्स’ आणि ‘कंट्री डान्स’ हे दोन्ही नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. हे दोन्ही नृत्यप्रकार जास्त उत्साहाच्या भरात येऊन केले जात नाहीत. या दोन्ही देशांच्या नृत्यप्रकारांसारखी त्यांची शैली आपल्याला क्रिकेटच्या मैदानातही पाहायला मिळते. ट्वेन्टी-२०चे राजे अशी बिरुदावली मिरवणारा वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडशी दोन हात करून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. या वर्षी युवा विश्वचषकात विंडीजने बाजी मारली होती. आता वेस्ट इंडिजचे पुरुष आणि महिला संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. या दोन्ही संघांनी जेतेपद पटकावल्यास वेस्ट इंडिजची एकाच वर्षांत विश्वविजयाची हॅट्ट्रिक होऊ शकेल आणि हे वर्ष त्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. पुरुष विश्वचषकात दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांना चालून आलेली आहे, त्यामुळे ही संधी सहजासहजी दोन्ही संघ सोडणार नाहीत. इंग्लंडने आतापर्यंत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेत एकही सामना न गमावणाऱ्या न्यूझीलंडवर मात करत त्यांनी साऱ्यांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला कडवे आव्हान देण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज असेल.
आमने सामने
ट्वेन्टी-२० सामने : १३
वेस्ट इंडिज : ९, इंग्लंड : ४
विश्वषकात : ३
वेस्ट इंडिज : ३, इंग्लंड : ०
संघ
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल, मार्लन सॅम्युअल्स, लेंडल सिमन्स, आंद्रे रसेल, दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, कालरेस ब्रेथवेट, सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, जेसन होल्डर, जेरॉम टेलर, अॅश्ले नर्स आणि इव्हिन लुईस.
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जो रूट, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोइल अली, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, आदिल रशिद, लायम प्लंकेट, सॅम बिलिंग्स, लायम डॉसन, रीस टॉप्ले आणि जेम्स व्हिन्स.
वेस्ट इंडिज
- साखळी फेरी ल्ल
वि. इंग्लंड : सहा विकेट्स राखून विजयी
वि. श्रीलंका : सात विकेट्स राखून विजयी
वि. द. आफ्रिका : तीन विकेट्स राखून विजयी
वि. अफगाणिस्तान : ६ धावांनी पराभव
- उपांत्य फेरी
वि. भारत : ७ विकेट्स राखून विजयी
इंग्लंड
- साखळी फेरी
वि. विंडीज : सहा विकेट्स राखून पराभव
वि. द. आफ्रिका : दोन विकेट्स राखून विजय
वि. अफगाणिस्तान : १५ धावांनी विजयी
वि. श्रीलंका : १० धावांनी विजयी
उपांत्य फेरी
- वि. न्यूझीलंड : ७ विकेट्स राखून विजयी
फलंदाजी
वेस्ट इंडिजने आतापर्यंतच्या सामन्यात नेत्रदीपक फलंदाजी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा सामनावगळता त्यांच्या फलंदाजांनी प्रत्येक विजयात मोलाचे योगदान दिले आहे. ख्रिस गेलसारखा झंझावाती खेळी साकारणारा फलंदाज त्यांच्याकडे आहे. लेंडल सिमन्स संघात आल्यावर त्याने पहिल्याच सामन्यात आपली चुणूक दाखवून दिली आहे. जॉन्सन चार्ल्ससारखा चांगला सलामीवीर त्यांच्या ताफ्यात आहे. त्याचबरोबर आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स, कर्णधार डॅरेन सॅमी आणि कालरेस ब्रेथवेट या अष्टपैलू खेळाडूंमध्ये धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे संघाच्या बाजूने झुकवण्याची कुवत आहे. फक्त दिनेश रामदिन हा त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मात्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही.
इंग्लंडकडेही चांगल्या फलंदाजांची कुमक आहे. जेसन रॉय, जो रूट आणि जोस बटलर या त्रिकुटाने आतापर्यंत प्रतिस्पध्र्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतलेला साऱ्यांनीच पाहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक २३० धावांचे लक्ष्य गाठले होते. त्यावेळी रूटची खेळी ही अविस्मरणीय अशीच होती. रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे इंग्लंडला जर फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवायचा असेल, तर या तिघांच्या धावांचे योगदान फार महत्त्वपूर्ण असेल. अॅलेक्स हेल्स हा मोठी फटकेबाजी करत असला तरी त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन हादेखील फलंदाजीसाठी क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असला तरी त्याला अद्यापही सूर गवसलेला दिसत नाही. अष्टपैलू मोईन अलीला जास्त फलंदाजीची संधी मिळालेली नसली तरी तो तळाच्या फलंदाजांना घेऊन संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मदत करू शकतो.
दोन्ही संघांचा विचार केला तर इंग्लंडपेक्षा विंडीजची फलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होत आहे. त्यांच्या बऱ्याच फलंदाजांनी आतापर्यंत विजयात अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी आणि वेस्ट इंडिजची फलंदाजी, यामध्ये खरे द्वंद्व पाहायला मिळणार आहे.
लक्षवेधी फलंदाज
इंग्लंड
जो रूट १९५ धावा
जेसन रॉय १८३ धावा
जोस बटलर १५५ धावा
वेस्ट इंडिज
जॉन्सन चार्लस ११६ धावा
ख्रिस गेल १०९ धावा
आंद्रे फ्लेचर १०६ धावा
गोलंदाजी
खेळपट्टी इंग्लंडच्या गोलंदाजांना पोषक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजीवर साऱ्यांच्याच नजरा असतील. बेन स्टोक्स हा सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याला ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड विली चांगली साथ देत आहेत, त्याचबरोबर लायम प्लंकेटही अचूक मारा करताना दिसत आहे. इंग्लंडच्या या चार गोलंदाजांवर मुख्य जबाबदारी असेल. खासकरून स्टोक्स, विली आणि जॉर्डन हे कसा मारा करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. मोइन अली आणि आदिल रशिद हे दोन फिरकीपटू संघात आहेत, यापैकी कदाचित रशिदला वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विंडीजचा मध्यमगती मारा हा ब्राव्हो, रसेल आणि ब्रेथवेट यांच्यावर अवलंबून असेल. यामध्ये रसेल आणि ब्रेथवेट हे मध्यमगती गोलंदाजीचे सारथ्य करतील. कारण अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करण्यामध्ये ब्राव्हो माहीर समजला जातो. खेळपट्टीचा नूर पाहता जेसन होल्डर किंवा जेरॉम टेलर या वेगवान गोलंदाजांपैकी एकाला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटू सॅम्युअल बद्री हे विंडीजचे या विश्वचषकातील सर्वात प्रमुख अस्त्र ठरले आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक बळी मिळवत फलंदाजांना चांगलेच चकवले असून त्याच्यामुळे सुनील नरिनचा वेस्ट इंडिजच्या चाहत्यांना विसर पडला आहे. डावखुरा फिकरीपटू सुलेमान बेननेही आतापर्यंत चांगला मारा केला आहे. पण खेळपट्टी पाहता त्याला वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लक्षवेधी गोलंदाज
इंग्लंड
डेव्हिड विली ७ बळी
ख्रिस जॉर्डन ६ बळी
मोईन अली ५ बळी
वेस्ट इंडिज
आंद्रे रसेल ८ बळी
सॅम्युअल बद्री ७ बळी
ड्वेन ब्राव्हो ६ बळी
क्षेत्ररक्षण
दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. इंग्लंडपेक्षा वेस्ट इंडिजच्या क्षेत्ररक्षणामध्ये अधिक उत्साह पाहिला जातो. पण या उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून काही चुकाही होतात, जशा उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीबाबत झाल्या होत्या. त्यामुळे विंडीजला क्षेत्ररक्षणावर अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
खेळपट्टीचा अंदाज
खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आल्याने ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल, असे म्हटले जात आहे. पण या खेळपट्टीवर फलंदाजांनाही चांगली मदत मिळू शकेल. या खेळपट्टीवर १७०-१८० धावा होऊ शकतात, पण यापेक्षा जास्त धावा होण्याची शक्यता विरळ आहे.
२००७ : भारत
संक्षिप्त धावफलक
भारत : ५ बाद १५७ (गौतम गंभीर ७५, रोहित शर्मा नाबाद ३०; उमर गुल ३/२८, सोहेल तनवीर १/२९, मोहम्मद आसिफ १/२५) विजयी वि. पाकिस्तान : १९.३ षटकांत सर्व बाद १५२ (इम्रान नाझीर ३३, मिसबाह-उल-हक ४३; आर.पी. सिंग ३/२६, जोगिंदर शर्मा २/२०, इरफान पठाण ३/१६); सामनावीर : इरफान पठाण.
२००९: पाकिस्तान
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ६ बाद १३८ (कुमार संगकारा नाबाद ६४, अँजेलो मॅथ्युज नाबाद ३५; अब्दुल रजाक ३/२०) पराभूत वि. पाकिस्तान : १८.४ षटकांत २ बाद १३९ (कामरान अकमल ३७, शाहिद आफ्रिदी नाबाद ५४, शोएब मलिक नाबाद २४; मुथ्थया मुरलीधरन १/२०, सनथ जयसूर्या १/८); सामनावीर : शाहिद आफ्रिदी.
२०१० : इंग्लंड
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ६ बाद १४७ (मायकेल क्लार्क २७, डेव्हिड हसी ५९, कॅमेरून व्हाईट ३०; रायन साईडबॉटम २/२६) पराभूत वि. इंग्लंड : १७ षटकांत ३ बाद १४८ (क्रेग किस्वेटर ६३, केव्हिन पीटरसन ४७, पॉल कॉलिंगवूड नाबाद १२, इयॉन मॉर्गन नाबाद १५; मिचेल जॉन्सन १/२७); सामनावीर : क्रेग किस्वेटर.
२०१२ : वेस्ट इंडिज
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ६ बाद १३७ (मार्लन सॅम्युअल्स ७८, डॅरेन सॅमी नाबाद २६; अजंथा मेंडिस ४/१२) विजयी वि. श्रीलंका : १८.४ षटकांत सर्व बाद १०१ (महेला जयवर्धने ३३, कुमार संगकारा २२, नुवान कुलसेकरा २६; सुनील नरीन ३/९, डॅरेन सॅमी २/६, मार्लन सॅम्युअल्स १/१५); सामनावीर : मार्लन सॅम्युअल्स.
२०१४ : श्रीलंका
संक्षिप्त धावफलक
भारत : ४ बाद १३० (रोहित शर्मा २९, विराट कोहली ७७; नुवान कुलसेकरा १/२९, अँजेलो मॅथ्युज १/२५, रंगना हेराथ १/२३) पराभूत वि. श्रीलंका : १७.५ षटकांत ४ बाद १३४ (महेला जयवर्धने २४, कुमार संगकारा नाबाद ५२, थिसारा परेरा नाबाद २३; सुरेश रैना १/२४, अमित मिश्रा १/३२); सामनावीर : कुमार संगकारा.
२०१६
वेस्ट इंडिज वि. इंग्लंड
- वेळ : रात्री ७.०० वाजल्यापासून.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.