बांगलादेशवर ३६ धावांनी मात
चालरेट एडवर्ड्सच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने बांगलादेशवर विजय मिळवत विश्वचषक अभियानाची दिमाखात सुरुवात केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चालरेट एडवर्ड्स आणि टॅमी ब्युमाऊंट जोडीने ३४ धावांची सलामी दिली. त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स मिळवत इंग्लंडच्या धावगतीला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र चालरेटने ७ चौकारांसह ५१ चेंडूंत ६० धावांची खेळी केल्याने इंग्लंडने दीडशेचा टप्पा ओलांडला. नतालिआ शिव्हरने २७ धावा केल्या. बांगलादेशतर्फे जहानारा आलमने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशची अवस्था २ बाद १४ अशी झाली. या धक्क्यातून बांगलादेशचा संघ सावरलाच नाही आणि त्यांनी केवळ ११७ धावांची मजल मारली. निगल सुलतानाने ३५ तर सलमा खातूनने ३२ धावांची खेळी केली. अन्या श्रुसबोलेने २ तर कॅथरिन ब्रँट, जेनी गन आणि डॅनिएल हाझेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. चालरेटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
इंग्लंडची विजयी सलामी
चालरेट एडवर्ड्सच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने बांगलादेशवर विजय मिळवत विश्वचषक अभियानाची दिमाखात सुरुवात केली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2016 at 04:49 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens world t20 2016 england ease to win over bangladesh