पुरुष संघाप्रमाणेच भन्नाट खेळाचे प्रदर्शन करत न्यूझीलंड महिला संघाने विश्वचषकात आर्यलडवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्यलडला केवळ ८४ धावाच करता आल्या.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सूजी बेट्स आणि सोफी डेव्हाइन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची मोठी भागीदारी केली. डेव्हाइनने ३४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावा केल्या. सूजीने ६० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर आर्यलडच्या फलंदाजांनी कूर्मगतीने फलंदाजीचे धोरण स्वीकारले. इसोबेल जॉयसने २८ धावा केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in