ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवत वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० महिला विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला १४९ धावांचे आवाहन दिले होते.
विश्वविजेपदाची हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते. मात्र, वेस्ट इंडिजच्या संघाने त्यांचे स्वप्न हे पूर्ण होऊ दिले नाही. सलामीवीर विलानी (५२) आणि लानिंग (५२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात पाच बाद १४८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून डॉटीनने दोन तर, मॅथ्यूज आणि अनिसा मोहम्मदचे प्रत्येकी एक गडी बाद केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा