फ्लिपकार्ट आणि अमेझॉनचा सेल हा ग्राहकांसाठी मोठी सुवर्ण संधीच घेऊन आलेला आहे. या दोन्ही सेलमध्ये ग्राहकांना ब्रँडेड फोन मोठ्या सूटसह मिळत आहेत. सेलमध्ये जोरदार खरेदी सुरू असून याचा फायदा मोबाईल कंपन्यांना देखील झाल्याचे समोर आले आहे. या सेलमधून आपल्याला किती फायदा झाला? याची आकडेवारी फोन निर्माती कंपनी सॅमसंग हिने जाहीर केली आहे.
इतकी विक्री झाली
स्मार्टफोन बनवणारी नामांकित कंपनी सॅमसंगने रविवारी सेलमध्ये झालेल्या विक्रीबाबत माहिती दिली. ई – कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सणासुदीच्या निमित्ताने सुरू असलेल्या सेलच्या पहिल्याच दिवशी कंपनीने १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मुल्याचे फोन्स विक्री केल्याचा दावा सॅमसंगने केला आहे.
(७ हजारांचा इअरबड केवळ २४९९ ला, Amazon sale मध्ये ‘या’ इअरबड्सवर मोठी सूट, सुवर्ण संधी सोडू नका)
या फोनचा दबदबा
सणासुदीच्या निमित्ताने सुरू असलेल्या या सेलमध्ये कोणत्या मोबाईलने १ हजार कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा ओलांडून दिला याची देखील सॅमसंग कंपनीने माहिती दिली आहे. गॅलक्सी सिरीजच्या फोनने हे यश मिळवून दिल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सॅमसंगने सेलच्या निमित्ताने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये १७ ते ६० टक्के कपात केली आहे. सॅमसंगच्या या कपातीने ग्राहाकांना प्रिमियम फोन्स मोठ्या बचतीसह मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अहवालांनुसार, सेलच्या पहिल्या दिवशी सॅमसंगने १२ लाखांहून अधिक गॅलक्सी फोन विकले आहे, जे भारतात एक नवा विक्रम आहे, असा कपनीचा दावा आहे. कंपनीनुसार, अमेझॉन सेलच्या पहिल्याच दिवशी सॅमसंग ही नंबर एक स्मार्टफोन ब्रँड होती, असा कंपनीचा दावा आहे.
(Apple iphone : लवकर इनस्टॉल करा IOS चा नवा अपडेट, अन्यथा कॅमेऱ्याची ‘ही’ समस्या कायम राहील)
गॅलक्सी एम १३ ठरला बेस्टसेलर
Galaxy M13 हा बेस्टसेलर फोन ठरला, तर Galaxy M 32 प्राईम एडिशन याला अमेझॉन सेलमध्ये ग्राहकांनी सर्वोच्च पसंती दिली. तर फ्लिपकार्ट बिग बिलियन डे मध्ये 4G galaxy f 13 याची सर्वाधिक विक्री झाली. प्रिमियम सेंगमेन्टमध्ये Galaxy S 21 FE and Galaxy S 22 plus ने चांगली कामगिरी केली.