TOP500 Project हे जगातील सर्वात शक्तिशाली ५०० सुपरकॉम्युटर्सची माहिती प्रसिद्ध केली जाते. या प्रकल्पाद्वारे वर्षातून दोनदा दमदार कॉम्युटर सिस्टीमची क्रमवार यादी तयार केली जाते. याचा वापर सध्या संगणकांच्या क्षमतेचा मापदंड म्हणूनही केला जातो. १९९३ मध्ये याची सुरुवात झाली होती. यंदाच्या ६१ व्या आवृत्तीमध्येही नव्या लोकप्रिय सुपरकॉम्युटर्सचा उल्लेख करण्यात आला आहे. मागच्या आवृत्तीप्रमाणे, यंदाच्या यादीमध्येही चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील सुपरकॉम्युटर्सच्या सर्वाधिक समावेश आहे. या यादीच्या पहिल्या १० कॉम्युटर सिस्टीममध्ये AMD प्रोसेसर, Intel प्रोसेसर आणि IBM प्रोसेसर असलेल्या सिस्टीम्सचा समावेश आहे. यावरुन या तीन प्रोसेसर्सना पसंती मिळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Frontier, USA

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Loksatta chip charitra China high tech sector US Chip supply Technology blockade Semiconductor
चिप चरित्र: तैवानचा तिढा!
Naxal-free, India, Naxalism, Naxal,
देशातील ६० जिल्हे नक्षलमुक्त ? जाणून घ्या, देशातील नक्षलवादाची स्थिती
sugarcane mills current status, sugarcane mills,
गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या घटली; जाणून घ्या, यंदाच्या हंगामातील सद्यस्थिती

Frontier ही TOP500च्या यादीतील पहिल्या क्रमांकावरील सुपर कॉम्युटर सिस्टीम आहे. अमेरिकेतील टेनेसी येथी Oak Ridge National Laboratory (ORNL) येथे हा सुपर कॉम्युटर आहे. या सिस्टीमने सध्या 8,699,904 कोर वापरून 1.194 Exaflop/s गाठले आहे. HPE Cray EX SYSTEM ही सिस्टीम एका Exaflop/s पेक्षा जास्त कामगिरी असलेली पहिली अमेरिकेतील पहिली सिस्टीम आहे. HPE Cray EX आर्किटेक्चर हे HPC आणि AI साठी ऑप्टिमाइझ केलेले 3rd Gen AMD EPYC CPUs, AMD Instinct 250X एक्सीलरेटर्स आणि Slingshot-11 इंटरकनेक्टसह एकत्र करते.

Fugaku, Japan

TOP500च्या यादीतील दुसरी सुपर कॉम्युटर सिस्टीम म्हणजे Fugaku. ही सिस्टीम जपानच्या कोबे शहरातील RIKEN सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल सायन्स (R-CCS) येथे आहे. यात 7,630,848 कोर असल्याने सिस्टीमला 442 Pflop/s चा HPL बेंचमार्क स्कोअर मिळवणे शक्य झाले.

LUMI, Finland

फिनलंडच्या CSC येथील EuroHPC केंद्रातील पर कॉम्युटर सिस्टीम यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ही HPE Cray EX System 309.1 Pflop/s च्या परफॉर्मन्स देते. युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग जॉइंट अंडरटेकिंग (EuroHPC JU) या संस्थेच्या प्रचंड डेटावर प्रक्रिया करण्यासाठी Exascale सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यासाठी युरोपियन संसाधने फिनलंडमध्ये एकत्र केली जातात.

आणखी वाचा – मृत व्यक्तीच्या Fingerprint चा वापर करुन त्याचा स्मार्टफोन Unlock करणं शक्य असते का? जाणून घ्या..

Leonardo, Italy​

इडलीमधील Leonardo हा सुपरकॉम्युटर TOP500च्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ही एक Atos BullSequana XH2000 सिस्टीम आहे. यात मुख्य प्रोसेसर म्हणून Xeon Platinum 8358 32C 2.6GHz, प्रवेगक म्हणून NVIDIA A100 SXM4 40 GB आणि इंटरकनेक्ट म्हणून Quad-rail NVIDIA HDR100 Infiniband चा समावेश करण्यात आला आहे. या सिस्टीमने 238.7 Pflop/s चा लिनपॅक परफॉर्मन्स मिळवला आहे.

Summit, USA

अमेरिकेतील टेनेसीमधील IBM-निर्मित Summit ही यादीतील पाचव्या क्रमांकावरील सुपरकॉम्युटर आहे. ही सिस्टीम ओक रिज नॅशनल लॅबोरेटरी (ORNL) येथे आहे. या सिस्टीमने HPL बेंचमार्कवर 148.8 Pflop/s चा परफॉर्मन्स केला आहे. या सिस्टीममध्ये 4,356 नोड्स आहेत. प्रत्येक नोटमध्ये प्रत्येकी २२ कोर असलेले POWER9 CPU आणि प्रत्येकी 80 स्ट्रीमिंग मल्टीप्रोसेसर (SM) आहेत. त्याशिवाय त्यात सहा NVIDIA Tesla V100 GPU आहेत. नोड्स मेलनॉक्स ड्युअल-रेल ईडीआर इन्फिनीबँड नेटवर्कसह जोडलेले आहेत.

Sierra, USA

आणखी एक सुपरकॉम्युटरचा समावेश यादीमध्ये आहे. Sierra ही सुपरकॉम्युटर सिस्टीम TOP500च्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. ही सिस्टीम अमेरिकेतील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी, सीए येथे आहे. याचे आर्किटेक्चर Summit सिस्टीमप्रमाणे आहे. 4,320 नोड्स, दोन POWER9 CPU आणि चार NVIDIA Tesla V100 GPU असणाऱ्या या सिस्टीमने 94.6 Pflop/s मिळवले आहेत.

आणखी वाचा – मोबाइल हॅक होण्याची भीती वाटते? घाबरू नका, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाल तर फोन चुकूनही हॅक होणार नाही

Sunway TaihuLight, China

चीनमधील सेंटर ऑफ पॅरलल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NRCPC) द्वारे Sunway TaihuLight ही सुपरकॉम्युटर सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. ही सिस्टीम 93 Pflop/s सह यादीतील सातव्या क्रमांकावर आहे.

Perlmutter, USA

TOP500च्या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर Perlmutter हा सुपर कॉम्युटर आहे. HPE Cray “Shasta” platform, AMD EPYC-based nodes and 1,536 NVIDIA A100 accelerated nodes यावर ही सिस्टीम आधारलेली आहे. या सिस्टीमला 64.6 Pflop/s मिळाले आहेत.

Selene, USA

अमेरिकेतील निवाडा येथील Selene ही कॉम्युटर सिस्टीम यादीमध्ये नवव्या स्थानावर आहे. हा संगणक NVIDIA DGX A100 SuperPOD एका घरामध्ये तयार करण्यात आला आहे. प्रणाली प्रवेगासाठी NVIDIA A100 सह AMD EPYC प्रोसेसर आणि नेटवर्क म्हणून Mellanox HDR InfiniBand यांवर ही कॉम्युटर सिस्टीम आधारलेली आहे. Selene कॉम्युटर सिस्टीमने 63.4 Pflop/s पर्यंतची मर्यादा गाठली आहे.

आणखी वाचा – अनावश्यक Ads च्या त्रासाने वैतागले आहात? स्मार्टफोनमध्ये ‘हे’ बदल करुन मिळवा जाहिरातींपासून सुटका

Tianhe-2A, China

Tianhe-2A हा सुपरकॉम्युटर चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT) द्वारे तयार करण्यात आला आहे. ही सिस्टीम चीनमधील नॅशनल सुपर कॉम्प्युटर सेंटरमध्ये आहे. या सिस्टीमने 61.4 Pflop/s मिळवले आहेत.

भारताच्या ‘ऐरावत’चा देखील आहे समावेश

भारताचा AI सुपरकॉम्प्युटर ‘ऐरावत’ (AIRAWAT) TOP500च्या यादीमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. ही सिस्टीम पुणे शहरामध्ये स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय PARAM Siddhi-AI supercomputer, Pratyush supercomputer आणि Mihir supercomputer या कॉम्युटर सिस्टीमदेखील या यादीमध्ये आहेत.

Story img Loader