इंटरनेटच्या या युगात, आज प्रत्येकाला त्यांच्या घरासाठी आणि स्मार्टफोनसाठी अशा प्लॅन्सची गरज आहे, ज्यात इंटरनेटसह विनामूल्य ओटीटी सदस्यता मिळू शकेल. आज आपण अशाच काही प्लान्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल १३ ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या ओटीटी अ‍ॅप्समध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिस्नी प्लस हॉटस्टार, आणि झी५ सारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. हे प्लॅन कोणत्या कंपनीचे आहेत, त्यामध्ये कोणते ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि इतर फायदे दिले जात आहेत ते जाणून घेऊया.

जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की कोणती कंपनी इतका चांगला ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे, तर एअरटेल,वोडाफोन आयडिया किंवा रिलायन्स जिओपैकी कोणतीही कंपनी हे प्लॅन देत नाही आहे. हे प्लॅन रेलटेल कंपनीची ब्रॉडबँड सेवा प्रदाता रेलवायरद्वारे ऑफर केले जात आहेत. रेलवायरची ब्रॉडबँड सेवा खूप स्वस्त आहे, तिचे नेटवर्क चांगले आहे आणि इंटरनेटचा वेगही खूप चांगला आहे.

आपला पर्सनल डेटा लीक होण्यापासून कसा वाचवायचा? जाणून घ्या सोप्या टिप्स

काही काळापूर्वी रेलटेलने अधिकृतपणे जाहीर केले आहे की ते त्यांच्या ग्राहकांना अनलिमिटेल ५० आणि १०० एमबीपीएस वाल्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये रेलवायर सतरंग कॅनव्हास अंतर्गत १३ ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. या ओटीटी अ‍ॅप्समध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video), डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar), झी५ (Zee5), सोनीलिव्ह (SonyLIV), इरॉसनाऊ (ErosNow), सननेक्स्ट (SunNext), एएचए तेलुगू (AHA telegu), अल्ट बालाजी (Alt Balaji), एपिकॉन (Epicon), एमएक्स प्लेअर (MX Player), वूट (VOOT), हंगामा मुव्हीज अँड टीव्ही शो (Hungama Movies & TV Shows) आणि हंगामा म्युजिक प्रो (Hungama Music Pro) यांचा समावेश आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही वेब सिरीज, चित्रपट, गाणी, लाईव्ह न्यूज आणि इतर अनेक मनोरंजन चॅनेलचा आनंद घेऊ शकाल.

Story img Loader