Xiaomi Redmi Phones Jio 5g : शाओमीने आपल्या काही स्मार्टफोन्सना ५जी सपोर्ट देण्यासाठी रिलायन्स जिओशी भागीदारी केली आहे. १३ एमआय आणि रेडमी फोन्सना रिलायन्स जिओ सपोर्ट मिळाले आहे. जिओ ५ जी वापरण्यासाठी शाओमी किंवा रेडमी स्मार्टफोन युजर्सना केवळ सेटिंग्समध्ये जाऊन प्रिफर्ड नेटवर्क ५ जी करावे लागेल. ज्या स्मार्टफोन्सना जिओ ५ जी सपोर्ट मिळाले आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे.
(४५ हजारांत घरी आणा Iphone 13, इअर एण्ड सेलचा घ्या लाभ, जाणून घ्या माहिती)
- Mi 11 Ultra 5G
- Xiaomi 12 Pro 5G
- Xiaomi 11T Pro 5G
- Redmi Note 11 Pro+ 5G
- Xiaomi 11 Lite NE 5G
- Redmi Note 11T 5G
- Redmi 11 Prime 5G
- Redmi Note 10T 5G
- Mi 11X 5G
- Mi 11X Pro 5G
- Redmi K50i 5G
- Xiaomi 11i 5G
- Xiaomi 11i HyperCharge 5G.
अडथळारहित कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी रेडमी के ५० आय आणि रेडमी नोट ११ टी ५ जी हे दोन्ही स्मार्टफोन रिलायन्स जिओ ट्रू ५ जी नेटवर्कसह अनेक चाचण्यांना सामोरे गेले आहेत. आज शाओमी आणि रेडमीमधील बहुतांष ५ जी सक्षम उपकरणे रिलायन्स जिओच्या ट्रू ५ जी नेटवर्कसह उत्तम कार करतात, अशी माहिती भागीदारीबाबत घोषणा करताना कंपनीने दिली.
(ऑनलाइन शॉपिंग करता? मग OTP Delivery Scam पासून सावधान! ‘अशी’ होते आर्थिक फसवणूक)
दहापेक्षा अधिक शहरांमध्ये जिओ ५ जी सेवा
देशात ५ जी सेवा सुरू होऊन २ महिने उलटले आहेत आणि ही सेवा पुरवण्यात रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या आघाडीवर आहेत. जिओ ५ जी सेवा दहापेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, वाराणसी, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नाथद्वार, पुणे, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि इतर शहरांचा समावेश आहे.