एअरटेल, रिलायन्स जीओ आणि व्होडाफोन आयडिया देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात. तुम्हीही स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी पर्यंत डेटा आणि एका महिन्याच्या वैधतेसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. चला तर मग जीओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या स्वस्त प्रीपेड प्लान्सबद्दल जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीओचा २५९ रुपयांचा प्लॅन
जीओचा हा प्लॅन एका महिन्यासाठी चालतो. यामध्ये कंपनी दररोज १.५ जीबी डेटा देते. प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस सह देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील मिळते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये जीओ अॅप्सची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.

आणखी वाचा : येत्या वर्षात रस्ते दाखवणारे ‘हे’ अॅप गुगल कायमचे बंद करणार; जाणून घ्या कारण…

व्होडाफोन आयडियाचा ३१९ रुपयांचा प्लॅन
एका महिन्याची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कंपनी दररोज २ जीबी इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉलिंग देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. व्होडाफोन आयडिया या प्लॅनमध्ये जास्तीत जास्त अतिरिक्त लाभ मिळत आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Binge ऑल नाईट मिळेल. यामध्ये तुम्हाला रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अमर्यादित डेटा वापरता येईल. याशिवाय, तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट देखील मिळेल. कंपनी प्लॅनच्या सदस्यांना Vi Movies आणि TV ऍपचे फ्री ऍक्सेस देखील देत आहे.

एअरटेलचा ३१९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज २ जीबी डेटा देत आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी दररोज १०० मोफत एसएमएस देखील देत आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकच्या मोफत सबस्क्रिप्शनसह फास्टॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: gb data per day between reliance jio airtel and vodafone idea plans pdb 95