Watch 200+ TV Channels Without Any Set-Top Box: लवकरच देशात टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवण्याची गरज भासणार नाही. कारण सेट टॉप बॉक्सशिवाय, टेलिव्हिजनमध्ये तयार केलेल्या सॅटेलाइट ट्यूनर्सच्या मदतीने सेट टॉप बॉक्सशिवाय टेलिव्हिजनमध्ये २०० हून अधिक चॅनेल देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर सामान्य प्रेक्षक सेट टॉप बॉक्स किंवा फ्री डिशशिवाय २०० हून अधिक चॅनेल पाहू शकतात, अशी माहिती नुकतीच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये टीव्हीच्या तंत्रज्ञानामध्ये व्यापक असे बदल झाले आहेत. स्मार्टफोन्सनंतर आता स्मार्ट टीव्हीचा काळ सुरू झाला आहे. या टीव्हींवर तुम्ही यूट्युब, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम यांसह अनेक अॅपचा अॅक्सेस मिळवू शकता.

Muramba
एकीकडे अक्षय माहीचे कौतुक करणार तर दुसरीकडे साई रमाला प्रपोज करणार; पाहा ‘मुरांबा’ मालिकेत काय घडणार?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Junaid khan and Khushi Kapoor starr rom-com Loveyapa box office collection day 2
जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाच्या चित्रपटाची चांगलीच टक्कर, जाणून घ्या दुसऱ्या दिवशीची कमाई
pune wifi loksatta news
पुणेकरांची मोफत वाय-फाय सेवा होणार बंद ? काय आहे कारण
Paaru
Video: गुंड प्रीतमला बेदम मारहाण करणार अन्…; किर्लोस्कर कुटुंबावर मोठे संकट; ‘पारू’ मालिकेत नेमके काय घडणार?
Two thousand CCTV cameras off in Nagpur
नागपुरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद, पालकमंत्र्यांनी हे दिले निर्देश
Nashik Saraf Association and Police discussed installing high qualitycctv cameras to prevent thefts
दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना, सराफ व्यावसायिक-पोलीस आयुक्त बैठक
Karnataka Kannada Minister struggles to write in Kannada
Karnataka : कर्नाटकच्या कन्नड भाषेच्या मंत्र्यांचाच कन्नडमध्ये लिहिताना गोंधळ; Video समोर आल्यानंतर केलं जातंय ट्रोल

(हे ही वाचा : Hidden Camera In Hotel: तुमच्या हॉटेल किंवा ट्रायल रुममध्ये Hidden Camera तर नाही ना? ‘असा’ घ्या शोध, राहा अलर्ट )

छतावर लावण्यासाठी अँटेना

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, सुमारे २०० टीव्ही चॅनेल मोफत आहेत. जे प्रेक्षक कुठलेही पैसे खर्च न करता पाहू शकतात. टीव्हीमध्ये बिल्ट इन सॅटेलाइट ट्युनर मिळाल्याने युझर्स कुठल्याही अडचणीविना फ्री-टू एअर चॅनेल पाहू शकतील. त्यासाठी त्यांना एक अँटिना लावावा लागेल. त्यामधून टीव्हीपर्यंत सिग्नल पोहोचेल.

ही सुविधा सुरू केल्यानंतर, २०० हून अधिक चॅनेल सामान्य प्रेक्षकांसाठी सेट-टॉप बॉक्स किंवा विनामूल्य डिशशिवाय उपलब्ध होतील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की फ्री डिशवर सामान्य मनोरंजन चॅनेलचा मोठा विस्तार झाला आहे, ज्यामुळे करोडो दर्शक आकर्षित करण्यात मदत झाली आहे.


Story img Loader