आजकालच्या काळामध्ये स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनला आहे. प्रत्येकजण स्मार्टफोन खरेदी करत असताना त्याचा कॅमेरा , स्टोरेज आणि बॅटरी याशिवाय अन्य फीचर्सची चौकशी करत असतो. सध्या काही फोन कंपन्या स्मार्टफोन लॉन्च करत असताना कॅमेरा क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला जर का फोटोग्राफीची आवड असेल तर काही स्मार्टफोन तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

तर आज आपण २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या काही स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये रिअलमी, मोटोरोला आणि सॅमसंगच्या काही फोन्सचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर

हेही वाचा : Layoff News: इंस्टाग्राम, स्नॅपचॅटसारखे असणारे ‘हे’ भारतीय अ‍ॅप करणार तब्बल २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात

Realme 11 Pro Plus

Realme 11 Pro Plus हा कदाचित २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणारा पहिला फोन नसेल. मात्र सध्या हा सर्वात तुम्ही खरेदी करू शकता. रिअलमी प्रो प्लस फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा फुलएचडी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच त्याचा स्क्रीनचा टच सॅम्पलिंग रेट ३६० Hz इतका असणार आहे. यामध्ये ड्युअल नॅनो सिमचा सपोर्ट आहे. तसेच फोनमध्ये क्टा-कोर 6nm मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 प्रोसेसर ग्राफिक्ससाठी Mali-H68 GPU देण्यात आले आहे. Realme 11 Pro+ 5G या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा Samsung HP3 प्रायमरी सेंसरसह येतो. हा सेंसर Super OIS सपोर्ट देतो. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतात. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा ग्राहकांना मिळणार आहे.

जर का तुम्ही अशा फोनच्या शोधात असाल की जो कॅमेरा आणि लूक या बाबतीमध्ये अन्य सेगमेंटमधील अन्य फोनशी स्पर्धा करेल. या फोनच्या ८/२५६ जीबी स्टोरेज असणारा फोन Flipkart वरून २७,९९९ रुपयांना बँक ऑफरशिवाय खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi Note 12 Pro Plus

या वर्षाच्या सुरूवातीला लॉन्च करण्यात आलेला रेडमी नोट १२ प्रो प्लस हे सिरीजमधील आजवरचा सर्वात महागडा फोन आहे यामध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा ८/२५६ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. तसेच रेडमीच्या या फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा वापरकर्त्यांना मिळतो. OIS चा प्रायमरी सेन्सर मिळतो. ज्याला ८ मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स आणि दुसरा २ MP चा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेऱ्यामधून कमी प्रकाशामध्ये देखील चांगले फोटो काढता येतात. नाईट मोडमध्ये फोटो अजून ब्राईट येतात.

रेडमी नोट १२ प्रो प्लस हा अँड्रॉइड १२ वर आधारित आहे. याला दोन अपडेट मिळणार असून, शेवटचे अपडेट हे अँड्रॉइड १४ चे असेल. या फोनची सुरूवातीची किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरू होती.

हेही वाचा : Airtel च्या ‘या’ ६ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळतात मोफत OTT चे फायदे आणि…, जाणून घ्या सविस्तर

Motorola Edge 30 Ultra

Motorola Edge 30 Ultra हा ड्युअल सीम फोन अँड्रॉइड १२ वर्जनवर चालतो. फोनमध्ये १४४ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंच एफएचडी + पोओएलईडी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेला गोरीला ग्लास ५ ची सुरक्षा मिळते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ + जेन १ एसओसी प्रोसेसरसह ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. गुणवत्तापूर्ण छायाचित्र मिळण्यासाठी फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन मिळते, जे १६ पिक्सेल्सना एकत्र करून एक अल्ट्रा पिक्सेल तयार करते. या फोनचे बेस व्हेरिएंट हे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या प्रकारामध्ये येते. हा फोन वापरकर्ते Flipkart वर ४४,९९९ रूपयांना खरेदी करू शकतात.

Samsung Galaxy S23 Ultra

Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन या सिरीजमधील सर्वात प्रीमियम आणि महागडा स्मार्टफोन आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 2 चे अपग्रेड व्हर्जन देण्यात आले आहे. वापरकर्त्यांना ६.८ इंचाचा QHD +AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.या फोनचे वजन हे २३४ ग्रॅम आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप येतो. तसेच याचा कॅमेरा या २०० मेगापिक्सलचा आहे. हे या फोनचे सर्वात महत्वाचे फिचर आहे. यात 3x आणि 10x ऑप्टिकल झूम सह १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि दोन १० मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आहेत. १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. या फोनमधून दिवसा आणि रात्री काढण्यात आलेल्या फोटोंची क्वालिटी ही चांगली असणार आहे. कमी प्रकाशामध्ये फोटो काढण्याची समस्या यामुळे दूर होणार आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रा या फोनही किंमत १,२४,९९ रूपयांपासून सुरू होते.

Story img Loader