Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याची पुष्टी केली आहे. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple चे हे पहिले रिटेल स्टोअर सुरु होण्याआधीच काही माहिती समोर आली आहे. या स्टोअरच्या लॉन्चिंगवेळी Apple चे सीईओ टीम कूक देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये अ‍ॅपलच्या कराराबद्दल सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

डेटा अ‍ॅनालिटिक फर्म CRE मॅट्रिक्स द्वारे अ‍ॅक्सेस केलेल्या करारानुसार आणि इकॉनॉमिक टाइम्सने मूल्यांकन केल्यानुसार, २२ ब्रँड हे Apple च्या रिटेल स्टोअरजवळ त्यांचे शॉप्स उघडू शक्त नाहीत. तसेच त्यांची जाहिरात देखील करू शकत नाहीत. हे २२ ब्रँड कोणकोणते आहेत हे जाणून घेऊयात.

Amazon, Facebook, Google, LG, Microsoft, Sony, Twitter, Bose, Dell, Devialet, Foxconn, Garmin, Hitachi, HP, HTC, IBM, Intel, Lenovo, Nest, Panasonic आणि Toshiba इत्यादी ब्रँड Apple रिटेल स्टोअर ज्या ठिकाणी लॉन्च होईल तिथे आपले शॉप्स उघडू शकणार नाहीत. या रिपोर्टमध्ये २१ नावांचा उललकेह करण्यात आला आहे. मात्र यामध्ये सॅमसंगचा देसखील समावेश असण्याची शक्यता आहे. ही लांबलचक यादी पाहता, किरकोळ सल्लागार कंपनी, थर्ड आयसाइट म्हणते की प्रतिस्पर्धी ब्रँडची इतकी मोठी यादी असणे असामान्य आहे.

हेही वाचा : BBC vs Twitter: ट्विटरने बीबीसीवर ‘गव्हर्मेंट फंडेड मिडियाचे लेबल लावताच कंपनीची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्ही एक…”

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून या महिन्यामध्ये दरम्यान होणार आहे.

Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे.  फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 brands cannot open shops near apple retail store jio drive mall bkc mumbai know details tmb 01
Show comments