Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक कायमच उत्सुक असतात. हा स्मार्टफोन बेस्ट फीचर्स आणि जबरदस्त डिझाईनने रंगलेला स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये धमाकेदार कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, Xiaomi च्या 5G फोनच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. हा स्मार्टफोन आता तुम्हाला अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किती मिळणार सूट?

कंपनीच्या वेबसाइटवर फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत ७९,९९९ रुपये आहे. हे आता ५४,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही आयसीआयसीआय बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ३,००० रुपयांची झटपट सूटही मिळेल. तसेच, एमआय एक्सचेंज डील अंतर्गत युजर्सना १६,५०० रुपयांपर्यंतचा फायदा देखील होऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेणाऱ्या यूजर्सला कंपनी ५ हजार रुपयांची अतिरिक्त सूटही देणार आहे.

आणखी वाचा : ‘या’ स्मार्टफोनची केवळ एका मिनिटात ३ लाख ५० हजार युनिट्सची विक्री; कॅमेरासह बरचं काही मिळेल जबरदस्त!

Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये काय आहे खास ?

Xiaomi 12 Pro 5G मध्ये ६.७३ इंच १२०Hz QHD + LTPO AMOLED डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन १ SoC देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे तर यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे Android 12 Best MIUI १३ वर चालेल. त्याच्यामध्ये ४,६०० mAh बॅटरी आहे जी १२०W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये ३२-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, तो ५० MP प्राथमिक कॅमेरा, ५० MP अल्ट्रावाइड आणि ५० MP टेलिफोटो कॅमेराने सुसज्ज आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 thousand off on xiaomis 5g smartphone pdb