3 Mouse Tricks : संगणकाचा माऊस हा छोटा असला तरी त्याचा उपयोग खूप मोठा आहे. झटपट कामे करण्यासाठी त्याचा अधिक वापर केला जातो. अॅप सिलेक्ट करणे, डबल क्लिक करून उघडणे यासह अनेक कामे त्याने करता येतात. लॅपटॉप युजर्स टचपॅडचा वापर करतात. तुम्ही माऊस टाळत असाल तर काही फायद्यांना तुम्ही मुकाल. हे फायदे तुमच्या वेळेचीही बचत करू शकतात. कोणते आहेत हे फायदे? जाणून घेऊया.
१) शिफ्टने टेक्स्ट कॉपी करा
टेक्स्ट कॉपी करण्यासाठी माऊसच्या कर्सरला ड्रॅग करून जिथपर्यंत मजकूर कॉपी करायचा आहे तिथपर्यंत ड्रॉप करतात. मात्र, माऊसच्या मदतीने ड्रॅग न करता तुम्ही हे काम झटपट करू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणापासून कॉपी करायचे आहे तिथे क्लिक करा आणि शिफ्ट दाबून ज्या ठिकाणापर्यंत कॉपी करायचे आहे तिथे थेट क्लिक करा आणि कॉपी करा. यासाठी तुम्हाला वारंवार ड्रॅग आणि ड्रॉप करण्याची गरज पडणार नाही.
(गुगलचं भन्नाट फिचर! आता चोरीला गेलेला मोबाईल रेंजमध्ये नसला तरीही सापडणार; कसा ते जाणून घ्या)
२) माऊसमधील टायर बटनचा असा करा वापर
माऊसच्या मधात असलेल्या टायर बटनचा वापर बहुतेक युजर्स मोठ्या फाइल्स तपासण्यासाठी करतात. मात्र, त्याच्या वापर या कामासाठीच नव्हे तर इतर कामे सहजरित्या करण्यासाठी करता येऊ शकतो. इंटरनेट ब्राऊझिंग करताना वेबसाईटवरील लिंकवर टायर बटनने क्लिक केल्यास ती लिंक वेगळ्या विंडोमध्ये ओपन होते. या कामासाठी लिंकवर राइट क्लिक करून ओपन लिंक इन न्यू टॅब करण्याची गरज पडणार नाही.
३) मधातून कोठूनही करा कॉपी
संपूर्ण परिच्छेद कॉपी करून नंतर त्यातून महत्वाचे मजकूर कॉपी करण्याची गरज नाही. यासाठी एक उपाय असून त्याने वेळेची बचत होईल. परिच्छेदामधील खालची आणि वरची लाइन कॉपी करण्यासाठी Alt सह खाली ड्रॅग आणि ड्रॉप करा. याशिवाय पॉइंटर थेट हायलाइट बटनवर घेऊन जाण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ‘स्नॅप टू सेक्शन’मधील ‘ऑटोमॅटिकली मुव्ह पॉइंटर टू द डिफॉल्ट बटन डायलॉग बॉक्स’वर ऑन करा.