देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे. बहुउपयोगी असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. स्मार्टफोन्सची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. भारत स्मार्टफोनचे मोठे बाजार असल्याने देश विदेशातील मोबाइल कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करत आहेत. लो बजेटपासून प्रिमियम फोन्सपर्यंत सर्व फोन बाजारात उपलब्ध आहेत. पण, तुम्हाला कमी बेजटमध्ये उत्तम फीचर असलेले फोन हवे असतील तर तशा फोन्सची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उत्तम फीचर देणारे फोन पुढील प्रमाणे आहेत.
१) मोटोरोला e40
मोटोरोलाचा हा फोन ६.५ इंचच्या एचडी डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये तुम्हाला ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो, तसेच ५ हजार एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीची इंटरनल स्टोरेज आहे.
२) नोकिया सी ३०
नोकियाचा हा फोन ६.८२ इंचच्या एचडी डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये मागे १३ मेगापिक्सेल आणि दोन मेगपिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी फोनमध्ये ६ हजार एमएएचची बॅटरी देत आहे.
३) इनफिनिक्स हॉट प्ले १२
हा फोन ६.८२ इंचच्या डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून सेल्फीसाठी पुढे ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन ४ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.
४) टेक्नो स्पार्क ९
टेक्नो स्पार्क हा फोन ६.६ इंच एचडी डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीची इंटरनल स्टोरेज आहे. फोन हिलियो प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे,
५) पोको सी ३१
या फोनमध्ये कंपनीने जी ३५ मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६.५३ इंचचा एचडी डिस्प्ले आहे. फोनच्या मागील भागात १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा असून सेल्फीसाठी पुढील भागात ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.