Features that may get in iphone 15 in 2023 : या वर्षी अनेक मोबाईल लॉच झालेत. विशेष म्हणजे, यात काही नाविन्यपूर्ण डिजाईन असलेल्या फोन्सचा देखील समावेश होता. यामध्ये iphone 14 pro मधील डायनामिक आयलँडने अ‍ॅपलच्या अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले. डायनामिक आयलँड हे आयफोनचे सॉफ्टवेअरवर आधारित तंत्रज्ञान आहे जे नॉचला इंटरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅकबारमध्ये बदलवते ज्याचे आकार युजर कॉल, नोटिफिकेशन, मीडिया प्लेयर आणि बरेच काही दाखवण्यासाठी कमी अधिक होऊ शकते. अशा अनोख्या फीचरमुळे चाहते दरवर्षी अ‍ॅपलच्या उपकरणांची वाट पाहतात. २०२३ साली iphone 15 series लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये ३ मोटे बदल तुम्हाला दिसू शकतात. कोणते असू शकतात हे बदल? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

1) यूएसबी टाइप सी पोर्ट

iphone 15 सिरीज यूएसबी टाइपसी पोर्टसह उपलब्ध होऊ शकते. सर्व स्मार्टफोन USB Type C port ने सुसज्ज होण्यासाठी युरोपियन युनियनने अंतिम मुदत दिली आहे. याचा अर्थ अ‍ॅपला आपल्या लाइटनिंग केबलवर पाणी सोडावे लागेल. २८ डिसेंबर २०२४ पासून सर्व सदस्य राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या आयफोनसह सर्व स्मार्टफोनमध्ये सामान्य यूएसबी टाइप सी चार्जर असले पाहिजेत, असे युरोपियन युनियनचे नवीन निर्देश आहेत.यावरून अ‍ॅपलला आपल्या फोनमध्ये टाइपसी चार्जर द्यावे लागेल.

(कॅनवा, फोटोशॉपला पर्याय, ‘या’ ३ वेबसाईट्सवर मोफत करा Photo editing, झटपट होईल काम)

युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणारे टॅब्लेट, स्मार्टफोन आणि कॅमेऱ्यांना सामान्य यूएसबी टाइप सी पोर्ट असावे, अशा कायद्याला युरोपियन युनियनच्या खासदारांनी संमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आयफोन १५ स्मार्टफोनला यूएसबी टाइप सी पोर्ट मिळू शकतो.

२) थर्ड पार्टी स्टोअरमधून अ‍ॅप डाऊनलोडची परवानगी

ब्लुमबर्गनुसार, अ‍ॅपल युजर्सना थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर्सवरून अ‍ॅप डाऊनलोड करू देण्याची योजना आखत असल्याचे समजते. यामुळे अ‍ॅपल युजर्सना अँड्रॉइड युजर्सप्रमाणे थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर्वरून अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार.

(नाविन्यपूर्ण डिजाईनमुळे लोकप्रिय झाले ‘हे’ 5 Smartphone, व्हिडिओ पाहून बनवणाऱ्याचे कराल कौतुक)

युरोपियन युनियनचा कायदा

युरोपियन युनियनने एक कायदा केला असून त्यात अ‍ॅपल ज्याला डिजिटल गेटकिपर म्हणून संबोधल्या जाते, त्यांना खुल्या बाजारपेठेची खात्री करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. अ‍ॅप स्टोअर निवडण्यासाठी युजरला निर्णय घेऊ देणे आवश्यक असून थर्ड पार्टी सेवांनाही आयओएसमध्ये भाग घेण्यासाठी संधी दिली पाहिजे, असा याचा अर्थ होतो.

अ‍ॅपलने युरोपियन युनियनचा कायदा पाळल्यास आयओएस युजर्सना त्यांच्या आवडीच्या अ‍ॅप स्टोअर्सवरून अ‍ॅप डाऊनलोड करता येणार. मात्र, असे करताना सुरक्षेची जबाबदारी ही युजरची असेल. युरोपियन युनियनच्या निर्णयाचा डेव्हलपर्सना देखील फायदा होईल.

(Reuse old smartphone : जुन्या फोनला बनवू शकता CCTV, आणखी कोणत्या कामासाठी वापरू शकता? जाणून घ्या)

3) आयफोन १५ मध्ये मिळू शकते हे नवीन फीचर

iPhone 15 Pro व्हेरिएंटमध्ये नवीन डायनामिक आयलँड फीचर मिळू शकते. हे फीचर आयफोन १४ प्रो मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १५ प्रोला देखील हे फीचर मिळणार असल्याचे म्हटल्या जाते.

४) नवीन चिपसेट

अ‍ॅपल कंपनी आयफोन १५ स्मार्टफोनमध्ये पुढील पीढीचे नवीन ए १७ चिपसेट देऊ शकते. हे चिपसेट बॅटरीचा वापर ३० टक्क्यांपर्यंत कमी करू शकते.

(कॅम्पिंग होणार मजेदार, ‘हे’ 5 Portable speakers देतात जबरदस्त आवाज, किंमत ५ हजारांपेक्षाही कमी)

5) नवीन डिजाईन

आयफोन १५ स्मार्टफोनला सध्या असलेल्या स्क्वेअर ऑफ डिजाईन ऐवजी गोल डिजाईन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, फोनला टायटेनियम बॉडी मिळू शकते.