5 smartphones with interactive design : २०२२ मध्ये अनेक स्मार्टफोन नाविन्यपूर्ण डिजाईनसह लाँच झाले होते. त्यांच्या विशिष्ट डिजाईनमुळे ते ग्राहकांच्या पसंतीस उतरले. इतर स्मार्टफोनमध्ये त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. हटके लूक असणारे हे स्मार्टफोन कोणते, याबाबत आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) नथिंग फोन (१) ग्लिफ इंटरफेस

२०२२ साली लाँच होताच Nothing Phone (1) स्मार्टफोन आपल्या ग्लिफ इंटरफेसमुळे चर्चेत आला. त्याचे नाविन्यपूर्ण डिजाईन हे ग्राहकांना भुरळ घालते. फोनच्या पारदर्शक ब्लॅक पॅनलसह ग्लिफ इंटरफेस हे फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. इंटरफेसमध्ये विविध आकारचे ५ लाइट बार्स आहेत. ही लाइट्स एकत्र किंवा एकमेंकांपासून स्वतंत्र सुरू होऊ शकतात. इनकमिंग कॉल, मेसेज आल्यास या स्मार्टफोनमधील लाइट्सचा झगमगाट होतो.

(कॅनवा, फोटोशॉपला पर्याय, ‘या’ ३ वेबसाईट्सवर मोफत करा Photo editing, झटपट होईल काम)

२) आयफोन १४ प्रो – डायनामिक आयलँड

अ‍ॅपलने iPhone 14 Pro मध्ये डायनामिक आयलँडसह आय आकाराचे नॉच दिले. हे आयफोनचे सॉफ्टवेअरवर आधारित तंत्रज्ञान आहे जे नॉचला इंटरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅकबारमध्ये बदलवते ज्याचे आकार युजर कॉल, नोटिफिकेशन, मीडिया प्लेयर आणि बरेच काही दाखवण्यासाठी कमी अधिक होऊ शकते. एका अ‍ॅपमधून दुसऱ्या अ‍ॅपमध्ये जाताना हे बार मल्टिटास्कींग पोर्टल म्हणूनही काम करते

3) रिअल मी जीटी प्रो – पेपर प्रेरित बॅक पॅनल

Realme GT 2 Pro स्मार्टफोनमध्ये पेपरपासून प्रेरित पॅनल देण्यात आले आहे. या फीचरमुळे युजरला अक्षरश: पेन्सिलने फोनच्या मागील बाजूस लिहिता येणे शक्य झाले. चुकल्यास इरेजरने लिहिलेले मिटवता देखील येते.

(FIFA world cup 2022 final: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉपवर लाइव्ह पाहण्यासाठी ‘हे’ करा)

४) असूस रोग फोन ६ प्रो – सेकंडरी डिस्प्ले

Asus ROG Phone 6 Pro स्मार्टफोनच्या मागच्या भागात सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले विविध माहिती दाखवू शकतो. या फीचरमुळे फोन आधुनिक आणि अधिक आकर्षक दिसून येतो.

५) टेक्नो फँटम एक्स २ प्रो – रिट्रॅक्टेबल पोर्ट्रेट लेन्स

Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमधील पोर्ट्रेट लेन्स पोर्ट्रेट शॉट घेताना कॅमेरा आयलँडच्या बाहेर निघतो. हे या फोनचे मोठे वैशिष्ट्ये आहे. चांगले छायाचित्र घेण्यासाठी हे फीचर देण्यात आले.