वनप्लसने oneplus 10 pro या आपल्या प्रिमियम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. तुम्ही हा फोन घेण्याच्या विचारात असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीमध्ये ५ हजार रुपयांची कपात केली आहे. हा फोन आता तुम्हाला बचतीसह घेता येईल. फोन व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमेराल्ड फॉरेस्ट या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन किंमत दिसून येत आहे.
वनप्लस १० प्रो हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी रोम अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत ६६ हजार ९९९ तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी रोम या व्हेरिएंटची किंमत ७१ हजार ९९९ रुपये आहे. कंपनीने किंमतीमध्ये ५ हजार रुपयांची कपात केल्यानंतर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत ६१ हजार ९९९ तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी रोम या व्हेरिएंटची किंमत ६६ हजार ९९९ रुपये झाली आहे.
(आता ग्रुपमध्ये घडवता येणार पोल, व्हॉट्सअॅपमध्ये असे करा तयार)
फोनमध्ये मिळत आहेत हे फीचर्स
वनप्लस १० प्रो स्मार्टफोनमध्ये हासेलब्लाड कॅमेरा, स्नॅपड्रॅगन चिपसेट, फास्ट चार्चिंग हे फीचर मिळते. फोन अँड्रॉइड १२ आणि कलर ओएस १२ वर चालतो. हा ५ जी फोन असून त्यात ५ हजार एमएएचची बॅटरी मिळते. फोनसोबत ८० वॉट फास्ट चार्जर मिळतो.
फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये ४८ एमपीचा मुख्य सोनी लेन्स, ५० एमपीचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि ८ एमपीचा मॅक्रो शुटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.७ इंचचा अमोलेड डिस्प्ले मिळतो.