व्हॉट्सअॅप हा सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग अॅप आहे. केवळ टेक्स्टच नव्हे तर व्हिडिओ, इमेजद्वारे व्यक्त होता येत असल्याने अनेक लोक त्याचा वापर करतात. युजरला गैरसोय होवू नये आणि चांगला अनुभव मिळावा यासाठी व्हॉट्सअॅप चालवणारी कंपनी मेटा येत्या काळात काही नवीन फीचर्स ग्राहकांच्या सेवेत सादर करणार आहे. हे फीचर सध्या बिटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहेत किंवा त्यांच्यावर काम चालू आहेत.
१) मेसेज एडिट करणे
एका ठरावीक काळ मर्यादेत पाठवलेला मेसेज एडिट करण्याची सोय व्हॉट्सअॅपकडून मिळणार आहे. वाबेटाइन्फोच्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅप ट्विटर सारख्या फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत त्यास एडिट करता येणार आहे. नवीन फीचरमध्ये एडीट केल्यानंतर चाट बबलमध्ये ‘एडिटेड लेबल’ असे दिसून येईल. या फीचरवर सध्या काम चालू आहे.
(काय आहे हॅशटॅग? इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी ‘असा’ करा वापर)
२) ग्रुपवरील सदस्य संख्या वाढ
ग्रुपवरील सदस्यांची संख्या वाढवण्याची व्हॉट्सअॅपची योजना आहे. सध्या ५१२ सदस्य ग्रुपमध्ये टाकता येतात. मात्र, लवकरच एका ग्रुपमध्ये १ हजार २४ सदस्य टाकता येणार आहेत. हे फीचर या आठवड्यात काही मोजके अँड्रॉइड आणि आयओएस व्हॉट्सअॅप बेटा टेस्टर्सच्या गटांना वापरता येणार आहे. हे फीचर अंमलात आल्यास ते टेलिग्रामला आव्हान देईल.
३) कॅप्शनसह डॉक्युमेंट शेअर
व्हॉट्सअॅप फोटो, व्हिडिओ, जीआयएफ कॅप्शनसह पाठवण्याची सोय देते. आता यावर एक नवा अपडेट येणार आहे. याने डॉक्युमेंट्स देखील कॅप्शनसह पाठवता येणार आहेत. या फीचरने चॅटमध्ये पाठवलेले किंवा मिळालेले डॉक्युमेंट सर्च पर्यायाच्या माध्यमातून युजरला शोधता येणार आहे. सध्या या फीचरवर काम सुरू आहे.
(स्मार्ट वॉचसह ‘हे’ गॅजेट्स हजार रुपयांच्या आत उपलब्ध, प्रवासात पडतील उपयोगी, जाणून घ्या ऑफर)
४) व्ह्यू वन्स मीडियावर स्क्रिनशॉट ब्लॉक करणे
व्हॉट्सअॅप सर्वात महत्वाचा अपडेट लाँच करणार आहे. युजरची वैयक्तिक माहिती जपण्यासाठी, तसेच सुरक्षा मजबूत करण्यासाठी व्हॉट्सअॅप सर्व युजरना ‘व्ह्यू वन्स’ वरील फोटो आणि व्हिडिओंचे स्क्रिनशॉट घेण्यावर प्रतिबंध घालणार आहे. हे फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे.
५) व्हॉट्सअॅपचे प्रिमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन
व्हॉट्सअॅप बिझिनेससाठी व्हॉट्सअॅप नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅन काढण्याची योजना करत आहे. या फीचरच्या मदतीने नवीन डिव्हाइसशी जुळताना चांगली पोहोच आणि सुधारणेसाठी अडव्हान्स्ड पेड फीचर वापरता येणार आहे. काही मोजक्या बिजनेस खात्यांसाठी हा प्लान असणार आहे, तसेच ते पर्यायी असणार आहे. हे फीचर सध्या काही निवडक बिटा युजर्ससाठी उपलब्ध आहे.