5 Whatsapp Tricks And Tips : व्हॉट्सअॅप आता दैनंदिन जीवनात संपर्कासाठीचे एक महत्वाचे साधन झाले आहे. त्यावरून व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल आणि मेसेजद्वारे अनेकांशी संपर्क साधता येतो. युजर एक्सपिरिएन्स वाढवण्यासाठी आणि युजरची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपने अनेक फीचर्सदेखील लाँच केले आहेत. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपशी संबंधित काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. मेसेज करताना या ट्रिक्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या आहेत कामी येणाऱ्या ५ व्हॉट्सअॅप ट्रिक्स
१) व्हॉट्सअॅपवर हजर आहे की नाही हे लपवू शकता
तुम्ही व्हॉट्सअॅपवर हजर आहे की नाही हे लपवू शकता. यासाठी तुम्हाला अॅपच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये काही बदल घडवावे लागतील. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर प्रायव्हसी अंतर्गत लास्ट सीन आणि ऑनलाइवर टॅप करा.
- आता नोबडी आणि सेम अॅज लास्ट सीनवर टॅप करा. या फीचरद्वार तुम्ही ऑनलाइन आहे असे कोणाला कळणार नाही. परंतु, तुम्हाला देखील इतर लोक ऑनलाइन आहेत की नाही हे कळणार नाही.
(गुगल पे काम करत नाही? मग Whatsapp आहे ना, ‘असे’ पाठवा पैसे)
२) डिलीट झालेला मेसेज परत दिसेल
व्हॉट्सअॅपने नवीन फीचर सादर केले आहे. जे युजर्स अनेकदा चुकून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ पर्यायाऐवजी ‘डिलीट फॉर मी’ पर्याय निवडतात, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
व्हॉट्सअॅप आपले बहुप्रतीक्षित फीचर अक्सिडेंटल डिलीट रिलीज करत आहे. या फीचरमुळे युजरला व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केल्यानंतर तो परत आणण्यासाठी ५ सेकंदांचा वेळ मिळेल. यामुळे चुकून डिलीट झालेला मेसेज परत रिस्टोअर करता येईल.
(WhatsApp New Feature: अँड्रॉइडवर शेअर करता येणार डेटा; काय आहे नवे फीचर जाणून घ्या)
डिलीट फॉर मी केलेला मेसेज परत कसा आणायचा?
- एका युजरला किंवा ग्रुप चॅटवर मेसेज पाठवा.
- आता डिलीट केलेल्या मेसेजवर टॅप आणि होल्ड करा.
- ‘डिलीट फॉर मी’ पर्यायावर टॅप केल्यावर ‘अंडू’ पर्याय दाखवले जाईल.
- डिलीट केलेला मेसेज तुम्ही ‘अंडू’ पर्यायावर टॅप करून पुन्हा रिस्टोअर करू शकता. तुम्ही नुकताच हटवलेला मेसेज तुम्हाला पुन्हा दिसेल.
अक्सिडेंटल डिलीट फीचर सर्व अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हा पर्याय दिसत नसल्यास तुम्ही अॅप अपडेट करा.
३) दीर्घ व्हॉइस मेसेज त्वरित रेकॉर्ड करू शकता
तुम्ही दीर्घ व्हॉइस मेसेज झटपट आणि वेगवेगळ्या वेळेच्या अंतराने रेकॉर्ड करू शकता तेही अर्धा रेकॉर्ड केलेला मेसेज न गमवता. यासाठी तुम्हाला चॅटमध्ये खाली उजव्या भगात असलेल्या माइक आयकनवर लाँग प्रेस करावे लागले. माइक आयकनला जास्तवेळ दाबा आणि लॉक आयकनवर सरकवा. व्हॉट्सअॅप तुमचे व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करणे सुरू करेल. तुम्ही ते लाल रंगाच्या माइक आयकनचा वापर करून पॉज देखील करू शकता. रेकॉर्डिंग काही वेळेसाठी बंद करायची असल्यास तुमची रेकॉर्डिंग डिलिट होणणार नाही. तुम्ही परत चाटमध्ये येऊन मेसेज रेकॉर्ड करणे सुरू ठेवू शकता.
(WhatsApp Pay मधून कोणाकोणाला केले पेमेंट? संपूर्ण माहिती मिळवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
४) थर्ड पार्टी अॅपद्वारे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग
युजर क्युब एसीआर या थर्ड पार्टी अॅपचा वापर करून कॉल रेकॉर्ड करू शकतात. हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. इन्स्टॉल केल्यावर कॉल रेकॉर्डिंगसाठी त्यास परवानग्या द्या. रेकॉर्डिंग झाल्यानंतर सर्व कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला या अॅपमध्ये दिसून येईल.
५) डिलीट केलेले मेसेज परत मिळवण्यासाठी वापरा हे अॅप
डिलीट केलेले मेसेज परत मिळवण्यासाठी किंवा ते वाचण्यासाठी तुम्ही गेट डिलिटेड मेसेज अॅप डाऊनलोड करू शकता. मात्र हे अॅप केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. काही परवानग्या दिल्यानंतर डिलीट झालेले मेसेज तुम्हाला या अॅपमध्ये वाचता येईल. बॅकग्राउंडमध्ये हे अॅप सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला त्याला काही परवानग्या द्याव्या लागतील. परंतु, व्हॉट्सअॅप चॅट सुरू असताना मेसेज डिलीट झाला तर तुम्हाला डिलीट झालेला मेसेज पाहता येणार नाही. केवळ चॅट सुरू नसताना हे अॅप तुम्हाला डिलीट मेसेज दाखवेल.