देशात लवकरच ५-जी सेवा सुरू होणार आहे. आता त्याचवेळी, एअरटेल, जीओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या भारतातील दूरसंचार दिग्गजांनी देखील ५-जी साठी त्यांची तयारी पूर्ण केली आहे. पुढील महिन्यात सणासुदीच्या काळात ५-जी सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जीओने दिवाळीला ५-जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर एअरटेलनेही ऑक्टोबर महिन्यात ५-जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तथापि, तुम्हाला ५-जी सेवेसाठी किती पैसे द्यावे लागतील. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
५-जी ची किंमत ?
जर आपण भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांबद्दल बोललो तर, जीओ आणि एअरटेलने अद्याप ५-जी सेवांची किंमत जाहीर केलेली नाही. याबाबत एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितले की, एअरटेलचे ५-जी प्लॅन ५-जी प्लॅनसारखेच असू शकतात. ते पुढे म्हणाले की, रिचार्ज प्लॅनची किंमत भविष्यात समोर येईल. दुसरीकडे, ज्या कंपन्या ५-जी सेवा चालवत आहेत त्या देखील ५-जी साठी ४-जी पेक्षा जास्त शुल्क आकारत नाहीत, असेही ते म्हणाले.
(आणखी वाचा : खुशखबर! जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने लाँच केले ३० दिवसांसाठीचे रिचार्ज प्लॅन; किंमत जाणून घ्या )
५-जी सेवा असतील स्वस्त
सध्या, जीओ आणि व्होडाफोन-आयडिया ने ५-जी रिचार्ज प्लॅनची किंमत जाहीर केलेली नाही, पण असा अंदाज वर्तवला जात आहे की, जीओ आणि व्होडाफोन-आयडियाचे प्लान एअरटेलपेक्षा किंचित स्वस्त असू शकतात. यापूर्वी असे समोर आले होते की ५-जी रिचार्ज प्लॅनची किंमत ४-जी पेक्षा जास्त महाग असू शकते. तथापि, सध्याची परिस्थिती पाहता, असे दिसते की ५-जी सेवा अतिशय परवडणारी असू शकते.
५-जी लाँच झाल्यानंतर किंमत वाढण्याची शक्यता
५-जी रिचार्ज प्लॅनच्या किमतींबद्दल, हे देखील उघड झाले आहे की लाँच दरम्यान किमती कमी असतील, परंतु आगामी काळात किमती वाढू शकतात. अशी रणनीती ४-जी सेवेदरम्यानही पाहायला मिळाली. दुसरीकडे, जर आपण ५-जी सेवा सुरू करण्याबद्दल बोललो तर, रिलायन्स जीओ आणि एअरटेल प्रथम भारतात ५-जी सेवा सुरू करू शकतात. तथापि, ५-जी लाँच करण्याबाबतची खरी तारीख उघड झालेली नाही. अहवालानुसार, २०२२च्या अखेरीस भारतातील प्रमुख शहरांमध्ये ५-जी सेवा सुरू होईल.