84 Days Recharge Plan Of Airtel Vi and Jio : मोबाईल फोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. पण, सतत रिचार्ज करण्याचा आपल्या सगळ्यांनाच खूप कंटाळा येतो. त्यातच अनेक जण दोन नंबर वापरतात. म्हणजे आणखीन जास्त खर्च. कारण- रिचार्ज प्लॅन दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. अशातच दोन सिममध्ये रिचार्ज करणे आणखीन कठीण होऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक लोक दीर्घकालीन रिचार्ज प्लॅन निवडण्याचा भर देत आहेत. जर तुम्ही रिलायन्स जिओ, एअरटेल किंवा व्हीआय सिम वापरत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खास माहिती घेऊन आलो आहोत.
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला रिचार्ज करून कंटाळला असाल, तर आम्ही जिओ, एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचे काही सर्वांत परवडणाऱ्या ८४ दिवसांच्या प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
जिओचा ८४ रुपयांचा परवडणारा प्लॅन (Jio 84 Days Recharge Plan)
जिओचा सर्वांत किफायतशीर ८४ दिवसांचा प्लॅन फक्त ७९९ रुपयांचा आहे, जो सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग देतो. त्याव्यतिरिक्त, तुम्हाला सर्व नेटवर्कवर दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस व अतिरिक्त मनोरंजनासाठी जिओ टीव्ही, जिओ हॉटस्टार व जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शनसुद्धा दिले जाईल.
एअरटेलचा ८४ दिवसांचा प्लॅन (Airtel 84 Days Recharge Plan)
त्याचप्रमाणे एअरटेल ८४ दिवसांचे अनेक प्लॅन्स प्रदान करते, ज्यामध्ये सर्वांत स्वस्त पर्याय ८५९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस व दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. तसेच एअरटेलचा ५८४ रुपयांचा प्लॅन ८४ दिवसांची वैधता देत असला तरी तो ८४ दिवसांत फक्त ७ जीबी डेटा प्रदान करतो.
व्हीआयचा ८४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन (VI 84 Days Recharge Plan)
व्होडाफोन-आयडियाचा ८४ दिवसांचा सर्वांत परवडणारा प्लॅन ९७९ रुपयांमध्ये येतो, ज्यामुळे तो जिओ व एअरटेलपेक्षा थोडा महागडा तर आहेच. पण, त्यात अतिरिक्त फायदेदेखील दिले जातात. जसे की, अमर्यादित मोफत कॉलिंग, एकूण १६८ जीबी डेटा; ज्यामुळे दररोज तुम्हाला २ जीबी डेटा वापरता येतो. तसेच दररोज १०० मोफत एसएमएससुद्धा दिले जातील. तसेच व्हीआयच्या ऑफरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे वीकेंड डेटा रोलओव्हर, जे युजर्सना न वापरलेला डेटा आठवड्याच्या शेवटी पुन्हा वापरण्याची परवानगी मिळते. त्याशिवाय ग्राहकांना अनेक लोकप्रिय ॲप्समध्ये मोफत प्रवेशदेखील मिळतो.
जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे हे सर्व प्लॅन दीर्घकालीन रिचार्जच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, ज्यामुळे युजर्सचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचण्यास मदत होईल.