899 rupees jio fiber plan : तुम्हाला ऑनलाइन कंटेट आवडत असेल तर रिलायन्स जिओकडे चांगले प्लान्स उपलब्ध आहेत. जिओ फायबर ग्राहकांना ३० एमबीपीएस, १०० एमबीपीएस आणि १५० एमबीपीएसच्या स्पीडसह अमर्यादित डेटा ऑफर करते. कंपनीकडून १०० एमबीपीएस स्पीड देणारे ३ ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहेत. त्यांची किंमत, ८९९, ७९९ आणि ६९९ रुपये आहे. जिओ फायबरच्या ८९९ आणि ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये फ्री ओटीटी अॅक्सेस मिळतो.
१) ८९९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या ८९९ रुपयांच्या जिओ फायबर प्लानची वैधता एक बिल साइयकल आहे. या प्लानमध्ये १०० एमबीपीएस स्पीडसह इंटरनेट मिळते. या प्लानमध्ये अमर्यादित वॉइस कॉल देखील मिळते. ८९९ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला ५५० पेक्षा अधिक टीव्ही चॅनल्सचा अॅक्सेस मिळतो.
(अॅपल आयफोनच्या crash detection फीचरची कमाल, अपघात झालेल्या महिलेची अशी केली मदत)
प्लानमध्ये Disney + Hotstar, Sony Liv आणि ZEE 5 सब्सक्रिप्शन देखील फ्रीमध्ये मिळते. याशिवाय वूट सिलेक्ट, वूट किड्स सहीत १५ ओटीटी प्लानची फ्री मेंबरशीप देखील मिळते. जिओ फायबरच्या या प्लानची किंमत ६९९ रुपये आहे. मात्र, कंपनी अतिरिक्त १४ ओटीटी अॅप्ससाठी ग्राहकांकडून २०० रुपये घेते.
२) 999 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी ९९९ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये Prime Video, Disney + Hotstar सह एकूण 15 OTT सब्सक्रिप्शनसह अमर्यादित डेटा मिळतो.