OnePlus स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Nord CE 2 Lite 5G हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असून Amazon Great Indian Festival Sale मध्ये OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. यामुळे हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करता येईल. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टफोनवरील ऑफर्स…
आता OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत
Amazon मध्ये या फोनची किंमत १८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यानंतर, तुम्ही ICICI, Axis किंवा Citi Bank कार्डद्वारे या फोनवर १ हजार रुपयांची अतिरिक्त झटपट सूट मिळवू शकता. जर तुम्ही EMI पर्याय निवडला तर तुम्हाला या फोनवर १,२५० रुपयांची झटपट सूट मिळू शकते. याशिवाय फोनवर १३,२५० रुपयांची एक्सचेंज ऑफरही सुरू आहे. त्यानंतर हा फोन खूपच स्वस्तात मिळू शकतो.
हे ही वाचा : Amazon Extra Happiness Days झाला सुरू; आयफोन सह इतर स्मार्टफोन मिळतायत अर्ध्या किंमतीत
One Plus Nord CE 2 Lite 5G ची वैशिष्ट्ये
One Plus Nord CE 2 Lite 5G हा ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android १२ वर आधारित ऑक्सिजन ओएसवर काम करतो. यात ६.५९-इंचाची FHD+ स्क्रीन आहे, जी १२०Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसरवर काम करतो. यात ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची प्रायमरी लेन्स ६४MPची आहे. याशिवाय या फोनला १६MP सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन ५०००mAh बॅटरीसह येतो आणि ३३W सुपर सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, ३.५ मिमी ऑडिओ जॅक होल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. हा फोन काळा आणि निळा या दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये येतो.