Emoji costs farmer fine: डिजीटल विश्वात इमोजींना फार महत्त्व दिले जाते. दररोज व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्ट्राग्राम यासह विविध सोशल मीडियावर चॅटींग करताना आपण टाईप करण्याऐवजी इमोजीचा जास्तीत जास्त वापर करतो. त्यामुळे सोशल मीडियावर हल्ली हसण्यापासून रडण्यापर्यंत आणि प्रेमापासून रागापर्यंतचे सर्व इमोजी उपलब्ध आहेत. तसेच सर्व सोशल मीडिया अॅप्सवर Thumbs-up इमोजींचा वापर केला जातो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशी सहमत असतो तेव्हा आपण सर्वजण ते वापरतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक बातमी सांगणार आहोत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला Thumbs-up रिअॅक्शन पाठवणे महागात पडले आणि त्याला ५० लाखांहून अधिक दंड भरावा लागला आहे. वाचा काय आहे नेमकं प्रकरण
नेमकं प्रकरण काय?
कॅनडाच्या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी थम्ब्स-अप इमोजीला स्वाक्षरी मानली आहे आणि यामुळे न्यायालयाने एका व्यक्तीला ५० लाखांचा दंड भरण्यास सांगितले आहे. कॅनडातील सास्काचेवान येथील कोर्ट ऑफ किंग्ज बेंचने नुकतीच साउथ वेस्ट टर्मिनल येथील धान्य खरेदीदाराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी केली, ज्यामध्ये खंडपीठाने हा निकाल दिला. वास्तविक, असे झाले की, एका धान्य खरेदीदाराने मार्च २०२१ मध्ये एका शेतकऱ्याला मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये खरेदीदाराने लिहिले होते की, कंपनी ८६ टन फ्लॅक्स प्रति बुशेल $ १२.७३ या दराने खरेदी करण्यास इच्छुक आहे.
धान्य खरेदीदार Kent Mickleborough यांनी Chris Achter नावाच्या शेतकऱ्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्याला कराराचे उत्तर देण्यास सांगणारा संदेश फोनवर पाठवला. यावर शेतकऱ्याने Thumbs-up इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली. जेव्हा डिलिव्हरीची पाळी आली तेव्हा शेतकऱ्याने अंबाडीची डिलिव्हरी केली नाही आणि नंतर त्याची किंमत वाढली. यानंतर दोघेही एकमेकांशी भांडू लागले. केंट म्हणाले की, ख्रिसने संदेशाला उत्तर दिले होते, याचा अर्थ करार ठीक होता. पण शेतकऱ्याने सांगितले की, त्याला फक्त इमोजीच्या माध्यमातून सांगायचे आहे की करार झाला आहे.
न्यायालयाने दिला ‘असा’ निकाल
या प्रकरणी निकाल देताना न्यायमूर्ती कीन यांनी शेतकऱ्याला $६१,६४१ म्हणजेच ५० लाख रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला. न्यायाधीशांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी Dictionary.com वरून इमोजीची व्याख्या वापरली. Dictionary.com नुसार, करार, मंजूरी किंवा प्रोत्साहन व्यक्त करण्यासाठी डिजिटल कम्युनिकेशनमध्ये इमोजीचा वापर केला जातो. न्यायमूर्ती कीन यांनी मान्य केले की, ही व्याख्या अधिकृत असू शकत नाही परंतु हा इमोजी त्यांच्या समजुतीनुसार आहे आणि म्हणून त्यांनी कराराची पूर्तता न केल्याबद्दल शेतकऱ्याला ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.