सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो , लॅपटॉप वापरतो. अनेक अशा गोष्टी आता टेक्नॉलॉजीमुळे सोप्या झाल्या आहेत. टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यात प्रगती झाली आहे. जीव सोपे झाले आहे. मात्र या टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हॅकर्स पैसे लुटण्याचे नवनवीन मार्ग शोधात आहेत. सायबर गुन्ह्याचे असेच एक प्रकरण सामोरे आले आहे . हे प्रकरण पाहता नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे तसे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. एका व्यक्तीचे एक लाख रुपये लुटले गेले आहेत. सायबर गुन्ह्याचे हे प्रकरण नक्की आहे तरी काय हे जाणून घेऊयात.
व्यक्तीची १ लाख रुपयांची फसवणूक
सायबर गुन्ह्याचे हे प्रकरण कर्नाटक राज्यातील आहे. कर्नाटकमधील एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्या व्यक्तीची ही फसवणूक FastTag चा रिचार्ज करताना झाली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा FastTag चा रिचार्ज करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
हेही वाचा : Microsoft ने लाँच केली ChatGPT टीम प्रीमियम सेवा, वापरकर्त्यांना मिळणार ‘हे’ फायदे
तो व्यक्ती २९ जानेवारी रोजी उडपीच्या ब्रह्मवारा मधून मंगळुरूकडे जात होता. जेव्हा तो व्यक्ती टोल प्लाझावर पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की , त्याच्या फास्टटॅग कार्डमध्ये आवश्यक तेवढा बॅलन्स नाही आहे. मग त्याने टोल भरण्यासाठी हेल्पलाईन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर त्याला एक नंबर सापडला आणि फास्टटॅगवर रिचार्ज करण्यासाठी त्या नंबरवर कॉल केला. मात्र हा कॉल त्याला महागात पडला.
या व्यक्तीने ज्या नंबरवर कॉल केला होत्या त्या व्यक्तीने आपली ओळख ही पेटीएम फास्टटॅगचा प्रतिनिधी म्हणून करून दिली. त्यानंतर रिचार्ज करण्यासाठी त्याने या व्यक्तीला फोनवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. या व्यक्तीने ओटीपी शेअर केला आणि काही वेळानंतर अनेक वेळा त्याच्या खात्यातून पैसे जात होते.
सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीच्या खात्यातून ४९,००० रुपये डेबिट झाले. त्यानंतर १९,९९९ रुपये , १९,९९८ रुपये , ९,९९९ रुपये व १,००० रुपये असे एकूण या व्यक्तीचे ९९,९९६ रुपयांची फसवणूक झाली आहे.
फास्टटॅग कसा रिचार्ज कराल ?
मात्र फास्टटॅग रिचार्ज करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. FASTag रिचार्ज करण्यासाठी तुम्ही Paytm, ZeePay आणि PhonePe सह कोणतेही युपीआय अॅप वापरून कार्ड रिचार्ज करू शकता.