Cyber Crime : ऑनलाईनच्या अतिवापरामुळे आपली सुरक्षा धोक्यात आली आहे. सायबर गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर येत आहे. अशातच सायबर सुरक्षा एजन्सी (CERT-In)ने नव्या इंटरनेट रॅनसमवेअर व्हायरस ‘अकीरा’संबंधी एक सूचना जारी केली आहे. हा मालवेअर (Malware) वैयक्तिक माहिती चोरतो आणि पैशांची वसुली करण्यासाठी डेटा गोळा करतो. एजन्सीने हेसुद्धा सांगितले की, हा संगणक मालवेअर विंडोज आणि लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर निशाणा साधत आहे. सायबर सुरक्षा एजन्सीने यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकीरा व्हायरस

रॅनसमवेअर एक मालवेअर व्हायरस आहे. जो युजर्सचा डेटा व सिस्टीम ब्लॉक करतो आणि उलट अ‍ॅक्सेस देण्यासाठी मागणी करतो. असेच रॅनसमवेअर ऑपरेशन आहे; ज्याला अकीरा असे संबोधले जाते. हा एक सायबर क्राइमचा भाग आहे.

हेही वाचा : चिमणी उडाली भुर्रर्र, Elon Musk यांनी बदलला ट्विटरचा लोगो; नवा लोगो पाहिलात का?

वैयक्तिक माहिती चोरू शकतो हा मालवेअर

अकीरा हा मालवेअर सुरुवातीला युजरची माहिती चोरतो आणि त्यानंतर सिस्टीमवर डेटा एका अशा विशिष्ट प्रकारच्या फॉर्ममध्ये रूपांतरीत करतो की, ज्यामुळे कुणीही हा डेटा वाचू शकत नाही. युजरसुद्धा हा डेटा वापरू शकत नाही आणि त्यानंतर हॅकर्स युजरकडे पैशाची मागणी करतात. जर युजरने पैसे देण्यासाठी नकार दिला, तर हॅकर्स युजरचा डेटा त्यांच्या डार्क वेब ब्लॉगवर (डार्क वेब ब्लॉग म्हणजे इंटरनेटची काळी बाजू; ज्या ठिकाणी सर्व प्रकारची बेकायदेशीर कामे केली जातात) टाकतात.

रॅनसमवेअर प्रोग्राम डाटा, रिसायकल बिन, बूट, सिस्टीम व्हॉल्युम सूचना व विंडोज फोल्डरला सोडून वेगवेगळ्या हार्ड ड्राइव्ह फोल्डर्समध्ये असलेल्या फाइल्सला एन्क्रिप्ट करते म्हणजेच डेटा लॉक करते. त्यानंतर युजरचा सिस्टीमवर कोणताही कंट्रोल राहत नाही.

हेही वाचा : Recharge Plans: १४८ रुपयांमध्ये मिळणार ‘इतका’ जीबी डेटा; पाहता येणार १५ OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंट

CERT-In एक अशी संस्था आहे जी अशा प्रकारच्या सायबर क्राइमपासून युजर्सला वाचवते. CERT-In ने युजर्सना ऑनलाइन सायबर क्राइमपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ऑपरेटिंग सिस्टीम आणि अ‍ॅप्स नियमित अपडेट करा, असेही त्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A ransomware akira virus which steal data from users to conduct an extortion cyber security agency issued a warning ndj
Show comments