Apple ही मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील एक आघाडीची कंपनी आहे. प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते की, आपल्याकडे Apple चा मोबाईल असावा. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सिरीज मधील स्मार्टफोन्स बाजारात आणत असते. मागील वर्षी कंपनीने Apple iPhone १४ ही सिरीज लाँच केली होती. कंपनी सिरीज १५ लवकरच लाँच करेल अशी अपेक्षा आहे. MacRumors च्या अहवालानुसार Apple कंपनी iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max कदाचित पूर्णपणे नवीन फीचर्ससह लाँच करू शकते जे याआधी कधीही आपण ऐकले नसतील. MacRumors च्या अहवालानुसार तंत्रज्ञान विश्लेषक जेफ पु सुचवतात की Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे टायटॅनियम फ्रेम, हॅप्टिक फीडबॅकसह , एक्सट्रा रॅम असे फीचर्स असण्याची शक्यता आहे.
भविष्यात अहवाल खरा ठरल्यास , iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये ४८ मेगापिक्सल वाईड लेन्ससह , तीन स्टॅक केलेला बॅक कॅमेरा असे फीचर्स या सिरीज मध्ये पाहायला मिळतील. अहवालात असेही म्हटले आहे की आयफोन 15 मॉडेल्स ऑप्टिकल झूम किंवा LiDAR स्कॅनरसाठी टेलिफोटो लेन्ससह येऊ शकत नाहीत.
हेही वाचा : पेनड्राइव्ह होणार आता तुमच्या कॉम्प्युटरचा ‘सुरक्षारक्षक’; कसं ते जाणून घ्या
MacRumours च्या अहवालात असेही सुचवले आहे की iPhone 15 मालिकेचे बेस मॉडेल हे iPhone 15 आणि iPhone 15 Plus आधीच्या सिरीज पेक्षा स्वस्त असू शकतात. टिपस्टर yeux1122 च्या अहवालात असेही नमूद केले आहे की क्यूपर्टिनो-आधारित कंपनी पुढील प्लस आयफोन यशस्वी करण्यासाठी दोन धोरणांचे मूल्यांकन करत आहे.
आयफोन १५ आणि आयफोन प्लस अधिक परवडणारी असेल. iPhone १४ प्लस ची किंमत ८९,९०० रुपये असून त्यामध्ये १२८ जीबी स्टोरेज येते. iPhone १४ या सिरीजची सुरुवातीची किंमत ७९,९०० इतकी आहे.