टेक्नो पॉप ५ (Tecno Pop 5) लाँच केल्यानंतर, टेक्नोने भारतात टेक्नो पॉप ५ प्रो लाँच केला आहे. ब्रँडने याबद्दल माहिती देणारी एक पोस्ट ट्विटरवर टाकली आहे. डिव्हाइसमध्ये 6000mAh बॅटरी असेल. ही बॅटरी या फोनचे सर्वात मोठे फिचर मानले जात आहे.
कसा आहे हा फोन?
टेक्नोने कॅमेरा स्पेक्ससह डिव्हाइसचे डिझाइन प्रकाशित केले आहे. टेक्नो पॉप ५ प्रो मध्ये मागील बाजूस रेगुलर कॅमेरा मॉड्यूलसह ड्युअल टोन फिनिश आहे. तर समोर दव-ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की टेक्नो पॉप ५ प्रो मध्ये ८ मेगापिक्सेल AI कॅमेरा सिस्टम असेल.
टेक्नो पॉप ५ प्रोचे स्पेसिफिकेशन
पॉप ५ प्रो मध्ये ६००० एमएएच क्षमतेच्या विस्तृतबॅटरीसह अद्वितीय बॅटरी बॅकअप आहे. युजर जवळपास ५४ तासांपर्यंत दुस-यांशी संवाद साधू शकतो किंवा जवळपास १२० तासांपर्यंत संगीत ऐकण्याचा आनंद घेऊ शकतो. तसेच बॅटरी लॅब व अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड इंटेलिजण्ट ऑप्टिमायझेशन्ससह दीर्घकाळापर्यंत बॅटरी बॅकअप देते.
(हे ही वाचा: Amazon Great Republic Day Sale 2022: मॅकबुक प्रो, एअरपॉड्स आणि अनेक प्रोडक्ट्सवर उत्तम डील्स)
यामधील १२० हर्ट्झ टच सॅम्प्लिंग रेंटसह पॉप ५ प्रो च्या स्मूदनेसचा अनुभव मिळू शकतो. जलद व एकसंधी कार्यसंचालनांसाठी ३ जीबी लार्ज रॅमसह ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज पॉप ५ प्रो मध्ये जलद गती व विनाव्यत्य कार्यसंचालनांसाठी ३ जीबी रॅम आहे. यामधील ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमता एसडी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबीपर्यंत वाढवता येते, ज्यामुळे या स्मार्टफोनमधील स्टोरेज क्षमता तुमच्या दैनंदिन मल्टीमीडिया गरजांसाठी पुरेशी आहे.
पॉप ५ प्रो मध्ये आयपीएक्स२ स्प्लॅश रेसिस्टण्ट असण्यासोबत १४ प्रादेशिक भाषांचा सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन १२० हर्ट्झ टच सॅम्प्लिंग रेंटची खात्री देतो, ज्यामुळे युजर्सना विनाव्यत्यय स्मार्टफोनचा अनुभव मिळतो. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ११ गो या आधुनिक अँड्रॉईडवर आधारित एचआयओएस ७.६ असण्यासोबत व्हॉल्ट २.०, स्मार्ट पॅनेल २.०, किड्स मोड, सोशल टूर्बो, डार्क थीम्स, पीक प्रूफ, वॉईस चार्जर, अॅण्टी-थेफ्ट अलार्म अशी स्थानिक वैशिष्ट्ये आहेत.
(हे ही वाचा: Jio vs Airtel: 2GB डेटा देणारा कोणता आहे बेस्ट प्लॅन? जाणून घ्या)
या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, जे समर्पित एचडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून जवळपास २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा जनरेशन झेडसाठी १० हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या विभागामधील परिपूर्ण स्मार्टफोन आहे.