Aadhaar and PAN card details leaked : बँकेत खातं उघडणं असो किंवा एखादा आर्थिक व्यवहार करायचा असो, अशावेळी पॅन, आधार कार्ड क्रमांक लागतो; त्यामुळे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची कागदपत्र ठरत आहेत. तसेच ही कागदपत्रे जपून ठेवणेसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. पण आज आधार कार्ड, पॅन कार्डसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की, आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar and PAN card) लीक करणाऱ्या दोन वेबसाइटची नावे नुकतीच समोर आली आहेत.

यावर उपाय म्हणून आधार आणि पॅन कार्डसह लाखो नागरिकांची वैयक्तिक माहिती बेकायदा उघड करणाऱ्या अनेक वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी सरकारने कारवाई केली आहे. हे पाऊल इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) द्वारे ओळखल्या गेलेल्या सुरक्षा उल्लंघनाच्या प्रतिसादात उचलण्यात आलं आहे.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Chandrapur district bank latest marathi news
चंद्रपूर जिल्हा बँकेची वादग्रस्त नोकर भरती: आजपासून मुलाखत
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय

UIDAI ने या वेबसाइट्सविरोधात पोलिस तक्रार केली दाखल :

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने वेबसाइट ऑपरेटर्सविरुद्ध आधार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिस तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा…Xiaomi Diwali With Mi : रेडमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार सहा हजारांची सूट; सेलच्या ऑफर्स, डिस्काउंटची ‘ही’ यादी पाहाच

एका निवेदनात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) जोर दिला आहे की, काही वेबसाइट्समध्ये महत्त्वपूर्ण सुरक्षा vulnerabilities म्हणजेच कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा नेटवर्कमध्ये अशा गोष्टी आढळणे, जे हॅकर्स किंवा अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास अनुमती देऊ शकतात. त्यामुळे मेईटीच्या (Meity) निदर्शनास आले आहे की, काही वेबसाइट भारतीय नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्डसह (Aadhaar and PAN card) वैयक्तिक माहिती लीक करत आहेत. सायबर सुरक्षा पद्धती आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याने याची गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. या अनुषंगाने, या वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात आली आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

आधार आणि पॅन कार्ड डेटा लिंक करणाऱ्या वेबसाइटचे नाव :

Reddit वरच्या एका पोस्टमध्ये असा दावा केला जातो की, आधार, पॅन कार्ड, (Aadhaar and PAN card) ड्रायव्हिंग लायसन्स डेटा लीक करणाऱ्या काही वेबसाइट्सची नावे moneycontrol.com वेबसाइटच्या अहवालात सांगण्यात आली आहेत. “इंडियन एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग’सारख्या वेबसाइट, नवी मुंबईस्थित संस्था, जी विमान देखभालवर लक्ष केंद्रित करते; जी २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आधार डेटा लीक करणाऱ्या वेबसाइट्सपैकी एक होती. त्याचप्रमाणे स्टार किड्झ, मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारा एक ई-प्लॅटफॉर्मदेखील २५ सप्टेंबरपर्यंत आधार कार्डची माहिती लीक करत होता. तसेच ही संबंधित URL आता ब्लॉक करण्यात आली आहे. मनीकंट्रोल या दोन्ही वेबसाइटशी संपर्क साधणार आहे आणि प्रतिसाद मिळाल्यावर लेख अपडेट केला जाईल, असे अहवालात म्हटले आहे.

आधार, पॅन कार्ड, (Aadhaar and PAN card) ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी वैयक्तिक डेटा लीक झाल्याने व्यक्ती ऑनलाइन घोटाळे, चोरीला बळी पडू शकतात आणि त्याचे गंभीर परिमाण होऊ शकतात. गेल्या आठवड्यात स्टार हेल्थ इन्शुरन्सशी संबंधितसुद्धा अशीच एक घटना घडली होती.

डेटा उल्लंघनाच्या संभाव्य धोक्यांवर प्रकाश टाकला :

सरकारकडून अशा वेबसाइट ब्लॉक करण्याची कारवाई भारतातील नागरिकांच्या की गोपनियतेचे संरक्षण करण्यासाठी आणि सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांना बळ देण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. कारण – डिजिटल जग सतत विकसित होत असताना, व्यक्ती आणि संस्थांनी डेटा सुरक्षेला प्राधान्य देणे आणि संभाव्य धोक्यांविरुद्ध जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.

Story img Loader